Wai Police esakal
सातारा

कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीशी संबंध; पुण्यातील 14 जणांना वाईत अटक

पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते.

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हाबंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्यांच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत.

राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्‍यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले. या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू होते. उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे 14 जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्‍यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या चौदा जणातील अनेक जण गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली. या सर्वांकडे कसून चौकशी सुरू आहे. उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता व त्यांना अटकही करण्यात आली नव्हती.

पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. या दोघांनी संबंधित चौदा जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पुण्यातील पोलिस अहवालाच्या प्रतीक्षेत उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र, त्यांच्यावर जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिस प्रथम दर्शनी दाखल करणार आहेत. नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहेत. वाई पोलिस ठाण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे व पथक दाखल झाले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा वाई पोलिस ठाण्यात सुरू होती.

गजा मारण्याच्या संबंधाचे चौकशी सुरू

वाई पोलिसांनी जिल्हा बंदीचा आदेश डावलून प्रवेश केलेल्या 14 जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व जण काही वसुलीच्या प्रकरणासाठी जिल्ह्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ताब्यात घेतलेल्या काही जणांचा गजा मारण्याच्या पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गजा मारण्याच्या टोळीचा काही संबंध आहे का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT