Marathwadi Dam esakal
सातारा

'टेंभू'चा हिस्सा 'मराठवाडी'तून रवाना; कऱ्हाड-पाटणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

2.73 टीएमसी क्षमतेच्या धरणात गेल्या पावसाळ्यात एक हजार 400 दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाला होता.

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : टेंभू योजनेसाठी (Tembhu Scheme) मराठवाडी धरणातून पाणी सोडण्यास नुकताच प्रारंभ झाला आहे. टेंभू प्रकल्पासह मराठवाडी धरणाच्या (Marathwadi Dam) लाभक्षेत्रात समाविष्ठ कऱ्हाड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्यामुळे दिलासा मिळणार आहे. (Water Was Released From Marathwadi Dam For Tembhu Scheme Satara News)

2.73 टीएमसी क्षमतेच्या धरणात गेल्या पावसाळ्यात एक हजार 400 दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाला होता.

वांग नदीवरील मराठवाडी धरणाच्या बांधकामाचा जसजसा उरक होत आहे, तसतसा त्यात पाणीसाठा वाढत आहे. २.७३ टीएमसी क्षमतेच्या धरणात गेल्या पावसाळ्यात एक हजार ४०० दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाला होता. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून आतापर्यंत चार वेळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. पाचव्या अवर्तनासाठी कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांच्या सूचनेनुसार जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचे सहाय्यक अभियंता एन. ए. सुतार यांनी आदेश काढल्यानंतर काल सकाळी सहायक अभियंता शरद पवार यांच्या उपस्थितीत १७५ क्यूसेसने विसर्ग सुरू करण्यात आला.

मराठवाडी धरणांतर्गत अनेक गावांचे पुनर्वसन टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात केल्याने या धरणातून टेंभूलाही प्रतिवर्षी एक टीएमसी पाणी देण्याचे नियोजन आहे. सध्या मराठवाडीत पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसल्याने ०.६ टीएमसी पाणी टेंभूला देण्यात येत आहे. काल सकाळी टेंभूसाठीचा राखीव पाणीसाठा धरणातून सोडण्यात आला. मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात अडविलेले नऊ बंधारे भरून वांग-कोयना व कृष्णानदीमार्गे हे पाणी टेंभूला पोहचेल. पावसाळ्यापर्यंत मराठवाडीतील विसर्ग सुरू राहणार असून नागरिकांनी जीव धोक्यात घालून नदीपात्रातून जे-जा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

राष्ट्रवादीच्या माजी आमदारास अटक; पाेलीस काेठडीत रवाना

Water Was Released From Marathwadi Dam For Tembhu Scheme Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : शिर्डीत हनुमान जयंतीला ताकदीचा जल्लोष! 125 किलो गोटा उचलण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT