सातारा

गावक-यांनाे सावधान! मराठवाडी धरणातून आज सोडणार पाणी

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार आजपासून (ता. 18) मराठवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहनही त्यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
 
टंचाई काळात लाभक्षेत्राला पुरून उरेल एवढा पाणीसाठा मराठवाडी धरणात शिल्लक असून, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सध्या लाभक्षेत्रात हळूहळू पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.

बांधकाम पूर्ण झालेल्या नदीपात्रातील नऊही बंधाऱ्यातून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज (गुरुवार) सकाळी दहा वाजता या रब्बी हंगामातील तिसरे आवर्तन होत आहे. याबाबत जिहे- कटापूर प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचे सहायक अभियंता एन. ए सुतार यांनी पत्रकाद्वारे सर्व संबंधित विभागांना कळविले आहे. नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्‍यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Latest Marathi News Live Update: शेतकरी कर्जमुक्ती प्रकरणी उच्च अधिकार समिती स्थापन

SCROLL FOR NEXT