weather update maan awaiting for rain Ten ponds store only twenty percent total water satara  sakal
सातारा

सातारा : माण तालुका अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

तालुक्यातील दहा तलावात एकूण पाणीसाठ्याच्या केवळ वीस टक्केच पाणीसाठा सध्या उरलाय

फिरोज तांबोळी

गोंदवले : जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातील पाणीसाठे भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. परंतु माणमध्ये अजूनही मोठा पाऊस न झाल्याने पाणीसाठे तळ गाठू लागलेत. आठवडाभरापूर्वी अत्यल्प पाणीसाठा उरलेल्या आंधळी व राणंद तलावात सध्या उपयुक्त पाण्याचा ठणठणाट झाला आहे. तालुक्यातील दहा तलावात एकूण पाणीसाठ्याच्या केवळ वीस टक्केच पाणीसाठा सध्या उरलाय.त्यामुळे आता लोक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. माण तालुक्यात पावसाचा लहरीपणा हा दुष्काळी परिस्थितीसाठी कारणीभूत ठरत आलाय. गेल्या काही वर्षांपूर्वी पाण्यासाठी टँकर तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागत होता. परंतु गेल्या अलीकडच्या काळात मात्र पुरेशा पावसाला जलसंधारणाची साथ मिळालीच, शिवाय उरमोडी प्रकल्पाचे पाणीही खळखळून वाहू लागल्याने ही परिस्थिती बदलून गेली.

गेल्या दोन -तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वत्र पाणीसाठे ओव्हरफ्लो झाले.त्यामुळे दुष्काळाच्या धगीपासून लोकांची सुटका झाली.याशिवाय काही भागाला अवकाळी झालेल्या पावसाने नुकसानीचा फटकाही सोसावा लागला.दुष्काळावर मात करण्यासाठी गावोगावी झालेल्या जलसंधारण कामामुळे पावसाचे पाणी त्या त्या भागात थांबून राहिल्याचे चित्र आता दिसत आहे. गेल्यावर्षी पावसाने व उरमोडीच्या पाण्याने तालुक्यातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहिले. परंतु पाण्याचा उपसाही वाढल्याने हा पाणीसाठा लवकर खालावला.तालुक्यात सध्या कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असला तरी तालुक्यातील आंधळीसह राणंद,लोधवडे,गंगोती, मासाळवाडी व महाबळेश्वरवाडी हे तलाव कोरडे पडले आहेत. तर पिंगळी,जांभूळणी,जाशी व ढाकणी तलावात कमी पाणीसाठा उरला आहे.

गेल्या आठवड्यात आंधळीमध्ये ०.७८ दशलक्ष घनमीटर तर राणंद तलावात २.१९दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उरला होता.सध्या तुलनेत जाशी तलावात सर्वाधिक म्हणजे ३४ टक्के पाणीसाठा आहे.तर त्या खालोखाल ढाकणी २१.८०, जांभुळणी १५.०४ व पिंगळी ११.८६ टक्के वापरयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.यंदा आधाप पावसाचा जोर नसल्याने तालुक्यातील दहा पैकी सहा तलावात उपयुक्त पाण्याची पातळी शून्य टक्के आहे.आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास सर्व तलाव भरून वाहण्याची शक्यता आहे.शिवाय माण नदी देखील भरून वाहण्याची आशा व्यक्त होत आहे. तालुक्यातील दहा तलावांची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५.३५ दशलक्ष घनमीटर असून एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.८७ दशलक्ष घनमीटर आहे.त्यापैकी केवळ २.२८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

पाणीसाठ्यांची सद्यस्थिती : कंसात एकूण उपयुक्त पाणीसाठा (सर्व आकडे दशलक्ष घनमीटर मध्ये) राणंद- (६.४२) मृतसाठा, पिंगळी- (२.३६) ०.२८,आंधळी- (७.४३) मृतसाठा, लोधवडे -(०.७०) मृतसाठा,जांभूळणी- (२.२६) ०.३४,गंगोती- (१.३६) मृतसाठा, महाबळेश्वरवाडी- (१.५०) मृतसाठा, ढाकणी- (२.६६) ०.५८,मासाळवाडी- (२.०२) मृतसाठा,जाशी- (३.१६) १.०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT