Redmi Note 11T 5G  Android Mobile launch in India
Redmi Note 11T 5G Android Mobile launch in India Google
विज्ञान-तंत्र

रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi ने भारतात आपला स्मार्टफोन Redmi Note 11T 5G भारतात लॉन्च केला आहे. हा नवीन Redmi फोन रेग्युलर Redmi Note 11 5G रीब्रॅंडेड व्हर्जन आहे जे Xiaomi ने गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च केले होते. Redmi Note 11T 5G फोन 90Hz डिस्प्लेसह आणि ड्युअल रियर कॅमेऱ्यांसह लॉंच करण्यात आला आहे. ग्राहकांना या फोनमध्ये होल-पंच डिस्प्ले डिझाइन मिळणार आहे आणि त्यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल. रेडमीच्या या फोनची थेट स्पर्धाही Realme 8s 5G, iQoo Z3 आणि Lava Agni 5G शी होणार आहे. (Redmi Note 11T 5G Android Mobile launch in India)

भारतातील किंमत आणि ऑफर (Redmi Note 11T 5G Price in India)

भारतात Redmi Note 11T 5G च्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB व्हेरियंटमध्ये देखील येतो, ज्याची किंमत अनुक्रमे 17,999 आणि 19,999 रुपये आहे. Redmi Note 11T 5G एक्वामेरीन ब्लू, मॅट ब्लॅक आणि स्टारडस्ट व्हाइट रंगांमध्ये येतो. तसेच हा फोन 7 डिसेंबरपासून Amazon, Mi.com, Mi Home आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. Redmi Note 11T 5G वर लॉन्च ऑफर अंतर्गत 1000 ची सूट दिली जात आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा EMI वापरून 1000 इंस्टंट सूट देखील मिळू शकते.

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स (Redmi Note 11T 5G Specifications)

Redmi Note 11T 5G फोन MIUI 12.5 सह Android 11 वर चालतो. यात 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह 6.6-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आणि 90Hz च्या अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे. फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 810 SoC, Mali-G57 MC2 GPU आणि 8GB पर्यंत LPDDR4X रॅमने सपोर्टेड आहे. Xiaomi ने RAM बूस्टर फीचर देखील प्रीलोड केले आहे जे मल्टीटास्किंगसाठी 3GB पर्यंत अतिरिक्त रॅम जोडण्यासाठी फोनच्या इंटरनल स्टोरेजचा वापर करते. Redmi Note 11T 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Redmi Note 11T 5G समोर 16- मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

Redmi Note 11T 5G फोन 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो जे microSD कार्डने 1TB पर्यंत वाढवता येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, इन्फ्रारेड (IR), USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आले आहे. फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे जे व्हॉइस असिस्टंट इनेबल करण्यासाठी आणि कॅमेरा लॉन्च करण्यासाठी डबल-टॅप शॉर्टकटला सपोर्ट देते. Redmi Note 11T 5G मध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे जी 33W प्रो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन बिल्ट बॅटरी एका चार्जवर दोन दिवसांपर्यंत चालेल असा दावा देखील कंपनी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT