tvs sport
tvs sport 
विज्ञान-तंत्र

जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप बाइक्स; किंमत आहे तुमच्या बजेटमध्ये

सकाळ डिजिटल टीम

Best Mileage Bikes : जर तुम्हीही नवीन मोटरसायकल घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला दररोज कामानिमीत्त प्रवास करावा लागत असेल, तर चांगले मायलेज देणारी बाईक घेणे तुमच्यासाठी बेस्ट ठरेल, त्यामुळे आज आपण सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या देशातील काही बाइक्स पाहाणार आहोत ज्या किंमतीच्या बाबतीतही तुमच्यासाठी परफेक्ट असतील आणि तुमच्या बजेटमध्ये बसतील.

1- बजाज CT100

मायलेज - 89.5 kmpl

किंमत - किंमत 52,832 रुपयांपासून सुरु

बजाज CT100 ही देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक मायलेज देणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे, या बाइकला भारतीय बाजारपेठेत खूप प्रेम मिळाले आहे.

इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये BS 6 कंप्लायंट 102 cc 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन इंजिन मिळते, जे 7500 rpm PS वर मॅक्झिमम 7.9 PS पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत. तसेच गाडीच्या इंधन टाकीची क्षमता 10.5 लीटर आहे.

2- TVS स्पोर्ट

मायलेज- 74 kmpl

किंमत - 58,130 रुपये ते 64,655 रुपये

या बाइकमध्ये यात 99.7 cc, 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 7350 rpm वर 8.1 bhp पॉवर आणि 4500 rpm वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. पेट्रोल टाकीच्या क्षमतेबद्दल सांगायचे तर, त्यात 10 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे.

3- हिरो HF 100

मायलेज- 70 kmpl

किंमत - 50,900 रुपये

Hero HF 100 ही देणार्‍या देशातील सर्वाधिक मायलेज देणार्‍या मोटरसायकलच्या यादीत घेतले जाते. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर याला 97.2 cc 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 8,000 rpm वर 7.91 bhp ची पॉवर आणि 5,000 rpm वर 8.05 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. करण्यासाठी यात 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. तसेच यात 9.1 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी दिली आहे.

Hero passion pro

मायलेज - 68kmpl

किंमत - 70 हजार रुपये

हीरोच्या या बाईकमध्ये, 110 CC चं सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 9.02 Bhp पॉवर आणि 9.79 Nm टॉर्क देते. या बाईकचं इंजिन XSens फ्यूल इंजेक्शन टेक्नोलॉजीवर आधारित आहे. कंपनीनं सांगितल्यानुसार ही बाईक प्रती लीटरमध्ये 68 किमी इतकं मायलेज देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT