broadband internet Plan 
विज्ञान-तंत्र

स्वस्तात मस्त ब्रॉडबँड प्लॅन्स; 500 पेक्षा कमीत मिळतोय 100GB डेटा

सकाळ डिजिटल टीम

broadband internet plans : देशातील सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. त्याची सुरुवात एअरटेलने केली होती. यानंतर मोबाईलवर मिळणारा इंटरनेट डेटाही महाग झाला आहे. जर तुम्ही OTT वर भरपूर कंटेंट पाहत नसाल आणि तुम्हाला स्वस्त इंटरनेट प्लॅन हवा असेल, तर आज आपण मोठ्या ब्रँड्सच्या एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांची किंमत 500 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये जिओ फायबर (Jio Fiber), टाटा स्काय (Tata Sky) आणि बीएसएनएल भारत (BSNL Bharat) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे ते बजेट फ्रेंडली आहेत आणि ते 6 महिने किंवा वर्षभरासाठीही खरेदी केले जाऊ शकतात.

एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन (broadband internet plans)

Airtel ब्रॉडबँड अनलिमीटेड प्लॅन (499 रुपये) : या प्लॅनमध्ये तुम्हाला 40Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. हा प्लॅन अशा व्यक्तीसाठी फायदेशीर आहे ज्यांना बर्याच डिव्हाइसेसवर इंटरनेटची आवश्यकता नाही. हा प्लॅन फ्री वाय-फाय राउटरसह येतो आणि तुम्हाला फ्री डीटीएच एक्स्ट्रीम बॉक्स देखील मिळेल. या बॉक्सच्या मदतीने, तुम्ही टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रुपांतर करू शकता आणि त्यावर OTT कंटेट प्ले करू शकतो. या प्लॅनसह, तुम्हाला विंक म्युझिक अॅपची सब्सक्रिप्शन, शॉ अकादमीवरील कोर्स आणि लँडलाइनवर अमर्यादित एसटीडी/लोकल कॉल यासारखे अतिरिक्त फायदे मिळतात.

जिओ फायबर प्लॅन (399 रुपये): हा प्लॅन 30 दिवसांसाठी 30 एमबीपीएस इंटरनेट स्पीड देतो. यासोबत तुम्हाला कोणताही अतिरिक्त बेनिफीट्स मिळणार नाहीत.

BSNL भारत फायबर प्लॅन (449 रुपये) : या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 Mbps स्पीड मिळेल, सोबत 3300 GB च्या फेअर यूसेज पॉलिसी (FUP) लिमीट आहे. 3300 GB डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग 2 Mbps पर्यंत घसरतो. प्लॅनसह, तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर 24 तास मोफत कॉलिंग मिळेल. प्लॅनसाठी ग्राहकाला एक महिन्याचा रेंटल चार्ज सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा करावे लागेल. 500 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज देखील द्यावा लागतो जो पहिल्या बिलात येईल.

BSNL भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅन( 499 रुपये): या प्लॅनमध्ये ग्राहकाला 50 Mbps च्या स्पीडने दर महिन्याला 100 GB डेटा मिळतो. 100 GB वापरल्यानंतर, वेग 2 Mbps पर्यंत कमी केला जातो. प्लॅनसाठीसाठी 499 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल. यासह, भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. जर ग्राहकाने दोन वर्षांचा प्लॅन निवडला, तर त्याच्याकडे तीन महिन्यांची फ्री सर्व्हिस देण्यात येते. तर तीन वर्षांच्या प्लॅनमध्ये 4 महिने फ्री सर्व्हिस मिळू शकते. हा प्लॅन अंदमान आणि निकोबार, राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ आणि कलकत्ता सर्कलमध्ये उपलब्ध नाही.

टाटा स्काय ब्रॉडबँड प्लॅन : या प्लॅनमध्ये तुम्हाला 50 Mbps स्पीड मिळेल. प्लॅनचा 3300 GB डेटा वापरल्यानंतर, स्पीड 3 Mbps पर्यंत कमी केला जातो. यासोबत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो पण त्यासाठी यूजरला स्वतंत्रपणे डिव्हाईस खरेदी करावे लागेल. या प्लॅनची किंमत कार्यकाळानुसार बदलते. 3 महिन्यांचा प्लॅन 2097 रुपये आहे, 6 महिन्यांचा प्लॅन 3300 रुपये आहे आणि 12 महिन्यांसाठी तुम्हाला 6000 रुपये द्यावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT