AI in Business Sector Esakal
विज्ञान-तंत्र

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

Artificial Intelligence in Business: AI मुळे उत्पादकता वाढते, खर्चात बचत होते आणि ग्राहकांना चांगली सेवा मिळते. या वर्षी ९३ टक्के सेवा संस्था AI मध्ये गुंतवणूक वाढवण्याची योजना आखत आहेत. भारतामध्ये AI चा वापर स्वयंचलित सारांश, अहवाल आणि ग्राहक-केंद्रित सामग्री ( auto-summary, reports and content) तयार करण्यासाठी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian professionals use AI : नुकतचं कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलचं (AI) नवीन संशोधन समोर आलय. भारतातील ९४ टक्के सेवा क्षेत्रातील व्यावसायिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करतात आणि त्यामुळे त्यांच्या कामाचा वेळ वाचतो असे असे या संशोधनात म्हणले आहे. सेल्सफोर्स या कंपनीने (salesforce company survey) केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

याच सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, AI वापरणाऱ्या संस्थांमधील ८९ टक्के सेवा व्यावसायिकांना या तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत होते.

“ग्राहकांच्या अपेक्षा वाढत असताना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये उत्पादकता वाढणे, खर्चात बचत आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणे याचा समावेश आहे,” असे सेल्सफोर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (विक्री) अरूण कुमार परमेश्वरन यांनी सांगितले.

“कृत्रिम बुद्धिमत्ता (AI and Data) आणि डाटा ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आवश्यक असलेला महत्वाचा टप्पा आहे,” असे ते म्हणाले.

या सर्वेक्षणात 30 देशांतील 5,500 पेक्षा जास्त सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश होता. त्यापैकी 300 जण भारतातून होते.

या अहवालानुसार, भारतातील ९३ टक्के सेवा संस्था या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या गुंतवणुकीत वाढ (AI use in business) करण्याचे नियोजन करीत आहेत. भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सेवांमध्ये स्वयंचलित सारांश (auto summary) आणि अहवाल, ग्राहकांसाठी माहितीपूर्ण लेख तयार करणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT