India may limit AC cooling to 20°C esakal
विज्ञान-तंत्र

AC Rules in India : भारतात एसी वापरावर येणार बंधन? तापमान 20 अंशांखाली सेट करण्याची अट, काय आहे नवा नियम?

India may limit AC cooling to 20°C : भारत सरकार एसीसाठी तापमान मर्यादा 20°C ते 28°C दरम्यान निश्चित करणार आहे. ऊर्जा बचत व हवामान बदलावर परिणाम कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.

Saisimran Ghashi

AC standardise in India : भारतातील घराघरात वापरल्या जाणाऱ्या एअर कंडिशनर्स (AC) संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भविष्यात एसी 20 अंश सेल्सियसपेक्षा कमी थंड आणि 28 अंशांपेक्षा जास्त गरम करता येणार नाही. यासाठी केंद्र सरकारकडून एसीसाठी नवीन तापमान बँड निश्चित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

काय आहे नवा नियम?

केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "लवकरच देशभरात एसीसाठी एकसंध तापमान मापदंड लागू केला जाणार आहे. याद्वारे एसी 20 अंशांखाली थंड किंवा 28 अंशांपेक्षा गरम ठेवता येणार नाही." हे एक पहिल्यांदाच होणारे पायलट प्रोजेक्ट असून यामुळे तापमान नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात बंधन येणार आहे.

तज्ज्ञांचा मते काय?

तज्ज्ञांच्या मते, 24 ते 26 अंश सेल्सियस हे शरीरासाठी सर्वाधिक आरामदायक तापमान आहे. त्यामुळे 20 अंशांपर्यंत थंड करणे केवळ ऊर्जा अपव्यय वाढवते, तर वातावरणातही नकारात्मक परिणाम करते.

ऊर्जा बचतीचा उद्देश

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) कडून देशभरात ऊर्जा बचतीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. AC चा वापर करताना ऊर्जा कार्यक्षमतेची जागरूकता वाढवणे, उच्च दर्जाचे 5 स्टार रेटेड एसी वापरणे आणि नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

जनतेकडून मागवले सुचवण्या

मार्च महिन्यात BEE ने नागरिकांकडून ऊर्जासंवेदनशील थंडावणाऱ्या उपाययोजनांबाबत सूचना मागवलेल्या होत्या. यामध्ये एसीच्या तापमान सेटिंगचा योग्य वापर, महागड्या एसीचा खर्च आणि त्याची उपलब्धता, खरेदीसाठी प्रोत्साहन योजना, बायबॅक योजना आणि फायनान्सिंग पर्याय अशा बाबींचा समावेश होता.

हवामान बदलावर नियंत्रण

सरकारचे हे पाऊल केवळ विजेचा अपव्यय कमी करण्यासाठीच नव्हे तर हरितगृह वायू उत्सर्जनात घट करून हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याचाही प्रयत्न आहे.

ही नियमावली केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित न राहता, कार्यालयीन आणि औद्योगिक क्षेत्रातही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशात ऊर्जा वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे स्थानकावर लोकांच्या आरोग्यासोबत खेळ! धक्कादायक व्हिडिओ समोर, पोस्ट पाहून संतापाल

71st National Awards: शाहरुख खान, विक्रांत मेस्सी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, पाहा विजेत्यांची यादी

Kolhapur Bench : आनंदाची बातमी ! ४० वर्षांच्या लढ्याला यश, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला मान्यता; 'या' तारखेपासून होणार सुरु

IND vs ENG 5th Test: शांत स्वभावाच्या Joe Root चा पारा चढला, प्रसिद्ध कृष्णा असं नेमकं त्याला काय म्हणाला? अम्पायरची मध्यस्थी

Georai Crime : अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे दोघे नाशिक येथे जेरबंद; पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा!

SCROLL FOR NEXT