Airtel Sakal
विज्ञान-तंत्र

Recharge Plans: एकही रुपया अतिरिक्त खर्च न करता फ्री मिळेल Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन, पाहा 'हे' स्वस्त प्लॅन

टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे ओटीटी बेनिफिट्ससह येणारे शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्सची किंमत खूपच कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Airtel Best Recharge Plans: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel कडे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात प्लॅन्ससोबत मिळणारे Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन बंद केले होते. मात्र, आता कंपनी इतर दोन प्लॅन्समध्ये Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन देत आहे. विशेष म्हणजे या प्लॅन्सची किंमत १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ओटीटीसोबतच कॉलिंग, डेटाचा देखील फायदा मिळेल. एअरटेलच्या या स्वस्त प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Airtel चा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Airtel कडे ३९९ रुपये किंमतीचा शानदार प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. विशेष म्हणजे यूजर्सला हे सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी दिले जाते.

या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात. तसेच, विंक म्यूझिक, फ्री हॅलो ट्यून, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक आणि Apollo 24|7 Circle चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

हेही वाचा: Smartphone Offer: एकच नंबर! २० हजारांच्या डिस्काउंटसह मिळतोय Samsung चा स्मार्टफोन, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

Airtel चा ८३९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शनसह येणारा Airtel कडे आणखी एक प्लॅन आहे. ८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनची किंमत ८३९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळेल.

Airtel च्या या प्लॅनमध्ये ८४ दिवसासाठी Xstream अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन दिले आहे. तसेच, Rewards Mini सबस्क्रिप्शन, Apollo 24|7 Circle, फ्री हॅलो ट्यून आणिविंक म्यूझिकची सुविधा दिली जाते. याशिवाय, कंपनीच्या ४९९ रुपये आणि ३३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील डिज्नी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ''परधर्मातील मुलासोबत पळून जाणाऱ्या मुलींचे हातपाय तोडा'', भाजपच्या माजी खासदाराचं वादग्रस्त विधान!

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

Crime: लग्नाच्या ११ दिवसांनी १६ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला, नंतर १९ व्या दिवशी पतीला अटक अन्...; घटना वाचून डोकं चक्रावेल

Nashik News : दत्त मंदिराची त्वरित पुनर्स्थापना करा; हिंदू एकता आंदोलन आणि काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा

Latest Marathi News Live Update : जळगावात रिक्षाचा अपघात, चंद्रकांत पाटलांकडून मदत

SCROLL FOR NEXT