airtel prepaid plans 
विज्ञान-तंत्र

Airtel चे प्रीपेड रिचार्ज प्लॅन महागले! जाणून घ्या नवीन किंमती

सकाळ डिजिटल टीम

Airtel Plan Price Hike : सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे, या कंपन्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बाजारात सतत नवीन आणि स्वस्त प्लॅन (Airtel Prepaid Plans) ऑफर करत असतात. दरम्यान, एअरटेलने नुकतेच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवण्याची घोषणा करत युजर्सना मोठा झटका दिला आहे. Airtel ने एकाच वेळी त्यांच्या 15 प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने त्यांच्या (Airtel Plan Price Hiked) या प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन किमती २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात

एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या टॅरिफ दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. या नवीन किंमत 26 नोव्हेंबरपासून लागू होतील. म्हणजेच 26 नोव्हेंबरपासून तुम्हाला Airtel चा प्रीपेड प्लॅन खरेदी करण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. रिपोर्टनुसार, कंपनीने 15 प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. तर येत्या काळात व्होडाफोन आणि जिओ देखील त्यांचे प्लॅन महाग करू शकतात, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या खिशाला अणखीनच झळ बसणार आहे.

Airtel 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले प्लॅन

Airtel ने 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. त्यानंतर यूजर्स आता एअरटेलचा 75 रुपयांचा प्लॅन हा 99 रुपयांना खरेदी करावा लागेल. तर 149 रुपयांच्या प्लॅनसाठी 179 रुपय मोजावे लागतील. तर 219 रुपयांचा प्लॅन आता 265 रुपयांवर महागला आहे. त्याच वेळी, 249 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 298 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय 299 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला 359 रुपये द्यावे लागतील.

एअरटेल 56 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले प्लॅन

Airtel च्या वापरकर्त्यांना आता 399 रुपयांचा प्लॅन 479 रुपयांमध्ये मिळेल. त्याच वेळी, 449 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 549 रुपये करण्यात आली आहे.

एअरटेलचा 84-दिवसांचा प्लॅन

Airtel ने आपल्या 84-दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. 455 रुपयांचा प्लॅन आता 598 रुपयांचा झाला आहे. तर 598 रुपयांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 719 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, 698 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 839 रुपये करण्यात आली आहे.

एअरटेलचा 365 दिवसांचा व्हॅलिडीटी प्लॅन

एअरटेलनेही आपल्या 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. 26 नोव्हेंबरपासून 1,498 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सना 1,799 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, 2,498 रुपयांचा प्लॅन आता महाग होईल आणि 2,999 रुपयांना मिळेल.

एअरटेलचा डेटा अॅड-ऑन पॅकही महागला

एअरटेलनेही आपल्या डेटा Add On पॅकची किंमत वाढवली असून आता 48 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला 58 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, 98 रुपयांचा प्लॅन 118 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर 251 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 301 रुपये करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Midterm Loss : इराण युद्ध ट्रम्प यांना भोवले; मध्यावधी निवडणुकीतील पराभवावर अखेर कबुली, पुन्हा हल्ल्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : 'तुम्ही दोन पावले पुढे या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल'; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

IND vs NZ, 1st ODI: विराटचं अर्धशतक, अर्शदीपच्या ४ विकेट्स, तरी अंशुल कंबोज कसा ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'? म्हणाला, एक वाईट सामना...

Marathi Film Industry: मातीशी पुन्हा जुळलेली ‘नाळ’

Adai Dosa Recipe: पीठ आंबवण्याची गरज नाही; झटपट बनवा प्रोटीनयुक्त 'अडई डोसा'! पौष्टिक आणि चवदार दाक्षिणात्य नाश्ता... 

SCROLL FOR NEXT