Airtel Network Problem Esakal
विज्ञान-तंत्र

देशभरात Airtel सेवा ठप्प; इंटरनेट संथ गतीने सुरू

आज सकाळपासून एअरटेल यूजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज सकाळपासून एअरटेल (Airtel) यूजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एअरटेलची ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा बंद आहे. मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये समस्या येत असल्याच्या तक्रारी देशभरातील एअरटेल युझर्स सोशल मीडियावर (Socila Media) करत आहेत. या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर ट्विटरवर #AirtelDown ट्रेंड करू लागला आहे.

Outage ट्रॅकर downdetector नुसार, आज सकाळी 11:30 पासून एअरटेलच्या इंटरनेटमध्ये विविध समस्या येत आहेत. अनेकांनी युजर्सनी सतत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार केली आहे. DownDetector ने अहवाल दिला की, आउटेजमुळे भारतातील दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा प्रभावित झाली आहे. (Airtel service halted across the country; Users Facing trouble in Broadband, mobile network)

नेटवर्कमधील काही समस्यांमुळे युजर्सना समस्यांना सामोरे जावे लागत असून या समस्या लवकरच दूर होतील, असे एअरटेल कंपनीने म्हटले आहे. या समस्येचा सामना करत असलेल्या शेकडो वापरकर्त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याची तक्रार केली आहे. काही युजर्स म्हणतात की, नेटवर्कमधील अडचणींमुळे त्यांना एअरटेल अॅप वापरता येत नाही. आउटेजनंतर ट्विटरवर मीम्सच्या माध्यमातून लोक कंपनीची खिल्ली उडवत आहेत.

एअरटेलने कालच आपला व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम (Airtel launches Xstream) लाँच केला आहे. नवीन प्लॅटफॉर्मवर एका अॅपमध्ये १५ भारतीय आणि विदेशी ओटीटी पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमच्या या नव्या पॅकची किंमत 149 रुपये प्रति महिना आहे. 1499 रुपये भरून तुम्ही वर्षभर टीव्हीवर मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या! शिक्षकांच्या ॲप्रूव्हल अन् अपॉइंटमेंटसाठीही पैसे लागतात, नितीन गडकरींचा परखड टोला!

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Panchang 13 July 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Latest Marathi News Updates : शरद पवारांच्या पक्षात भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदेंचे नाव चर्चेत

Sunday Healthy Breakfast: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक व्हेजिटेबल मुग डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT