Amazon Appstore Shutdown on Android Mobile esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Shutdown : शॉपिंग प्रेमींचं हार्टब्रेक! मोबाईलवर बंद होणार ॲमेझॉन ॲपस्टोअर, कंपनीच्या धक्कादायक निर्णयामागे 'हे' आहे कारण

Amazon Appstore Shutdown on Android Mobile : ॲमेझॉन आपल्या ॲप स्टोअरला अँड्रॉइड डिव्हायसवर बंद करण्याचा निर्णय घेत आहे. मात्र, हे ॲप स्टोअर फक्त ॲमेझॉनच्या फायर डिव्हायसवर उपलब्ध राहील.

Saisimran Ghashi

ॲमेझॉन ने आपल्या Android डिव्हाइससाठी असलेले Appstore बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 20 ऑगस्ट 2025 नंतर हे अॅपस्टोअर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. मात्र, कंपनीच्या Fire TV आणि Fire Tablets यासारख्या स्वतःच्या उपकरणांवर हे Appstore चालू राहणार आहे.

Android आणि Windows प्लॅटफॉर्मवरून सपोर्ट बंद

ॲमेझॉन ने डेव्हलपरांना अधिकृत सूचनांद्वारे कळवले आहे की, आता Appstore साठी नवीन अॅप सबमिट करता येणार नाही. तसेच, कंपनीने आपले Amazon Coins डिजिटल करन्सी प्रोग्राम देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रोग्राम अॅपस्टोअरमध्ये गेम्स आणि अॅप्स खरेदीसाठी वापरण्यात येत असे. 20 ऑगस्टनंतर या कॉइन्सचा उपयोग करता येणार नाही, आणि उर्वरित कॉइन्सचा ग्राहकांना परतावा मिळेल.

याशिवाय, ॲमेझॉनने Windows प्लॅटफॉर्मवरूनही आपल्या Appstore चा सपोर्ट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 5 मार्च 2025 पासून Windows वरूनही हे अॅपस्टोअर पूर्णपणे बंद होईल.

Amazon च्या म्हणण्यानुसार, Android डिव्हाइसेसवर Amazon Appstore चा वापर अत्यल्प प्रमाणात होत आहे, त्यामुळे कंपनी आता मुख्यतः Fire TV आणि Fire Tablets यांसारख्या स्वतःच्या उपकरणांसाठी Appstore सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

McAfee Labs च्या संशोधकांनी यापूर्वी Amazon Appstore मध्ये एक मालवेअरयुक्त अॅप आढळल्याचे अहवाल दिले होते. हे अॅप आरोग्यविषयक साधन म्हणून स्वतःला सादर करत होते, पण प्रत्यक्षात युजर्सच्या डिव्हाइसवर मालवेअर इंस्टॉल करत होते.

ग्राहकांनी काय करावे?

ॲमेझॉन ने 2011 मध्ये Google च्या Play Store ला पर्याय म्हणून Appstore सुरू केले होते. Fire Phone सारख्या प्रकल्पांमध्येही हे अॅपस्टोअर महत्त्वाचा भाग होते. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने आणि Android वापरकर्त्यांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने कंपनीने आता Appstore ला मर्यादित स्वरूपात चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

20 ऑगस्ट 2025 पर्यंत Amazon Appstore मधील अॅप्स आणि डिजिटल खरेदींचा वापर करून घ्यावा. Amazon Coins असल्यास कंपनीच्या परताव्याबाबत अधिकृत अपडेटसाठी लक्ष ठेवावे. Fire TV आणि Fire Tablets वापरणाऱ्या ग्राहकांसाठी Appstore पुढेही कार्यरत राहील, त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT