Speakers Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale: घरच्या घरी येईल थिएटरसारखा फील, स्वस्तात मस्त स्पीकर्सवर मोठ्या डिस्काऊंटची ऑफर

या स्पीकरवर सध्या मोठा डिस्काऊंट मिळत असल्याने ते बजेटमध्ये आहेत.

वैष्णवी कारंजकर

थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. थिएटरमध्ये आवाज आणि डिस्प्ले इतका भारी असतो की एखादा चांगला नसलेला चित्रपटही चांगला वाटू लागतो. घरच्या घरी थिएटरसारखा आवाज आणि फील मिळत असेल तर मग बाहेर जावंच लागणार नाही. पण आता प्रश्न असा आहे की घरच्या घरी थिएटरसारखा आवाज कसा मिळवायचा? त्यावर उत्तर म्हणजे अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्पीकर्सवर खूप चांगली सूट दिली जात आहे.

Akai UltraBoom-80 RMS

होम थिएटर ब्लूटूथ पोर्टी बॉक्स स्पीकरवर तुम्हाला ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. त्यामुळे हे स्पीकर तुम्ही ५,९९० रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.. हे 80W RMS आउटपुट पॉवरसह येते आणि याला बासही मोठा असल्याने तुम्हाला घरच्या घरी थिएटरसारखा फील घेता येईल. हा स्पीकर तुम्ही टीव्हीला कनेक्ट करू शकता.

मार्शल विलेन पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर

या स्पीकरवर तुम्हाला ३३ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतं. हे स्पीकर तुम्ही ९,९९८ रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

हा स्पीकर IP67 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससह येतो आणि कंपनीचा दावा आहे की तो एकदा चार्ज केला की १५ तासांपेक्षा जास्त काळ वापरला जाऊ शकतो.

बोस साऊंडलिंक फ्लेक्स ब्लूटूथ पोर्टेबल स्पीकर

या स्पीकरवर तुम्हाला २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला हा स्पीकर ११,८९७ रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकेल. हा स्पीकर IP67 रेटिंगसह धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करणारा आहे.

JBL Go 2 वायरलेस पोर्टेबल स्पीकर

या स्पीकरवर ४७ टक्के सवलत मिळत असून तो तुम्हाला १,५९८ रुपयांना खरेदी करता येईल. एकदा चार्ज केल्यानंतर हा स्पीकर तुम्ही ५ तास वापरू शकता, असा दावा या कंपनीने केला आहे.

BOAt Stone 352 ब्लूटूथ स्पीकर

हा स्पीकर तुम्ही अॅमेझॉनवरुन १,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. यावर ५७ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. हा स्पीकर IPX7 रेटिंगसह येतो आणि एकदा चार्ज केल्यानंतर १२ तासांपर्यंत वापरता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT