Anand Mahindra on Vision Pro Esakal
विज्ञान-तंत्र

Apple Vision Pro: आता टीव्ही होणार बंद? अ‍ॅपलचं नवीन डिव्हाईस पाहून आनंद महिंद्रांचं भाकित; व्यक्त केली मोठी भीती

Anand Mahindra on Apple Vision Pro: आनंद महिंद्रा यांनी या हेडसेटचं कौतुक केलं आहे. यासोबतच त्यांनी एक धोक्याचा इशाराही दिला आहे.

Sudesh

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आपला एआर हेडसेट सादर केला आहे. व्हिजन प्रो (Apple Vision Pro) असं नाव असलेला हा हेडसेट सध्या बराच चर्चेत आहे. अगदी आनंद महिंद्रा यांनीदेखील या हेडसेटचं कौतुक केलं आहे. मात्र, यासोबतच त्यांनी एक धोक्याचा इशाराही दिला आहे.

व्हिजन प्रो हा अ‍ॅपलचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट आहे. या डिव्हाईसमुळे यूजर्स कम्प्युटर स्क्रीनवरील गोष्टी चक्क हवेतच पाहू आणि हाताळू शकणार आहेत. बाहेरचं जग आणि डिजिटल जग यांना कनेक्ट करणारा हा हेडसेट आहे.

केवळ डोळे आणि हाताच्या माध्यमातून तुम्ही याला कंट्रोल करू शकाल. याचे फीचर्स दाखवणारा व्हिडिओ अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी अपलोड केला होता.

आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra on Vision Pro) हे ट्विटरवर भरपूर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांनी टिम कुक यांच्या व्हिडिओला रिट्वीट करत, या तंत्रज्ञानाबद्दल आपलं मत मांडलं आहे.

अ‍ॅपलच्या या हेडसेटमुळे टेलिव्हिजनचा अंत होईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अ‍ॅपलच्या या हेडसेटमध्ये तुम्ही 4K व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. त्यामुळे महिंद्रा यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

सोनी-सॅमसंगचा उल्लेख

टीव्ही बनवणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या सोनी आणि सॅमसंगचा उल्लेखही महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. अ‍ॅपलच्या या हेडसेटला उत्तर देण्यासाठी सोनी आणि सॅमसंग काय करत आहेत? असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

व्यक्त केली भीती

आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये एक मोठी भीती व्यक्त केली आहे. एकत्र बसून चित्रपट आणि खेळाचे सामने पाहण्याच्या सवयीचं आता काय होईल? याच्या जागी आता केवळ हेडसेट घातलेले झॉम्बीच आपल्याला पाहायला लागतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अ‍ॅपलचा हा व्हीआर हेडसेट पुढील वर्षी लाँच केला जाईल. याची किंमत 3,499 डॉलर्स (सुमारे २ लाख ८८ हजार रुपये) असणार आहे. सुरुवातीला अमेरिकेत लाँच केल्यानंतर हळूहळू हा जगभरात उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT