Mobile Technology News esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Technology : फोन हरवल्यावर लगेच मिळणार परत; फोन ऑफ झाल्यावरही मिळणार लाइव्ह लोकेशन

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्येत झपाट्याने वाढ

सकाळ डिजिटल टीम

Android phone trackr : अँड्रॉईड फोन चोरीला गेल्यावर तो परत मिळेल याची अपेक्षाच आपण सोडून देतो. कारण चोरी करणारा व्यक्ती फोन चोरल्यावर लगेचच स्वीच ऑफ करतो. त्यामूळे तो सापडत नाही. तूमचाही फोन हरवला असेल तर आधी पोलिसात तक्रार करावी लागते. पून्हा कागदपत्रे आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात.

फोन शोधण्यासाठी तूम्हाला गुगलचेच फीचर ‘फाइंड माय फोन’ची मदत घेऊ शकता. पण, आम्ही तुम्हाला एका थर्ड पार्टी अॅपबद्दल सांगत आहोत. याच्या मदतीने स्वीच ऑफ केल्यानंतरही फोन ट्रॅक करता येतो.

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. स्मार्टफोनशिवाय आपली अनेक कामे थांबतात. स्मार्टफोन हरवला की समस्या येते. पण, चोरीला गेलेला फोन तुम्ही सहजपणे ट्रॅक करू शकता. फोन स्वीच ऑफ केल्यानंतर त्याचा माग काढण्यात खूप अडचणी येतात. पण, तुम्ही फोन बंद केल्यानंतरही तो ट्रॅक करता येतो. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड अॅपची मदत घ्यावी लागेल.

अनेक केसेसमध्ये पोलिस फोन ट्रॅक करून योग्य व्यक्तीकडे सोपवतात. पण या प्रक्रीयेला वेळ लागतो. त्यामूळे सुरक्षा काही टिप्स वापरून तुम्ही तुमचा स्वत:च शोधून काढू शकता. यासाठी अनेक अॅप्स सहज उपलब्ध होतील.

गुगलवर ट्रॅक इट इव्हन इफ इट इज ऑफ (Track it EVEN if it is off) हे अॅप उपलब्ध आहेत. अँड्रॉईड युजर्स ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. हे हॅमर सिक्युरिटीला सपोर्ट करते. ते वापरायलाही अधिक सोपे असते.

अॅप डाउनलोड केल्यानंतर, ते ओपन करण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन परमिशन घ्यावी लागते. यात डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो पूर्णपणे स्वीच ऑफ होत नाही. तर चोराला फोन बंद झाल्याचे जाणवते.

लोकेशन ओळखले जाईल

हे ऍप चोरी झालेल्या फोनचे लोकेशन, सेल्फी आणि ज्या व्यक्तीच्या हातात फोन आहे त्याचे इतर डिटेल्सही तूम्हाला इमरजेंसी नंबरवर पाठवते. हे अॅप फोनचे लाईव्ह लोकेशनही पाठवत राहते. हे ट्रॅक करणे खूप सोपे करते.

तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर हे तुमच्यासाठी खूप युजफूल अॅप आहे. गुगल प्ले स्टोअरवरही याला चांगले रेटिंग देण्यात आले आहे. फोन चोरीला गेल्यास हे तुम्हाला खूप मदत करेल.त्यामूळे आजच हे अॅप डाऊनलोड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT