iPhone 14 Saves Life eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 14 Saves Life : 400 फूट खोल दरीत कोसळली कार; 'आयफोन'च्या खास फीचरमुळे वाचला जीव

केवळ आयफोनने पाठवलेल्या संदेशामुळे या व्यक्तीला शोधणं शक्य झालं..

Sudesh

अ‍ॅपलच्या स्मार्टवॉच आणि आयफोनमुळे आतापर्यंत कित्येक लोकांचा जीव वाचवला आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला झोपेत असताना तिला हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता होती. अशा वेळी अ‍ॅपल वॉचने इशारा देऊन वेळीच तिला जागं केलं होतं. आता आणखी एका प्रकरणात चक्क दरीत कोसळलेल्या व्यक्तीचा जीव आयफोनने वाचवला आहे.

लॉस अँजेलिसमधून ही घटना समोर आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, माउंट विल्सन क्षेत्रात प्रवास करत असणाऱ्या एका व्यक्तीची कार अचानक 400 फूट खोल दरीमध्ये कोसळली. दरीत कोसळल्यानंतर देखील हा व्यक्ती जिवंत होता. मात्र, त्याठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नव्हतं. अशात आयफोनच्या फीचरमुळे त्याचा जीव वाचला आहे.

काय आहेत फीचर्स?

अ‍ॅपलच्या iPhone 14 मध्ये क्रॅश डिटेक्शन हे फीचर इनबिल्ट मिळतं. यासोबतच, ज्या यूजर्सनी आपली ऑपरेटिंग सिस्टीम iOS 16.1 पर्यंत अपडेट केली आहे त्यांना इमर्जन्सी एसओएस हे फीचरदेखील इन्स्टॉल करता येतं. अपघातावेळी हे दोन्ही फीचर्स यूजर्सच्या भरपूर कामी येतात.

असा वाचला जीव

या व्यक्तीच्या आयफोनमध्ये हे दोन्ही फीचर्स उपलब्ध होते. या व्यक्तीची कार दरीत कोसळत असताना आयफोनचं क्रॅश डिटेक्शन फीचर अ‍ॅक्टिव्हेट झालं. यानंतर इमर्जन्सी SOS फीचरमुळे सॅटेलाईटच्या मदतीने नजीकच्या इमर्जन्सी टीमला यूजरची लोकेशन आणि अपघाताची माहिती पाठवण्यात आली.

या अपघातामध्ये ही व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. बचाव पथक जेव्हा अपघाताच्या ठिकाणी पोहोचलं, तेव्हा ही व्यक्ती बेशुद्ध होती. केवळ आयफोनने पाठवलेल्या लोकेशनच्या मदतीने, भरपूर प्रयत्न करून बचाव पथक या व्यक्तीपर्यंत पोहोचलं होतं. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

SCROLL FOR NEXT