iPhone 16 Flipkart Discount Offer esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 16 Discount Offer : खुशखबर! iPhone 16 स्मार्टफोनवर मिळतोय 42 हजारचा डिस्काउंट; पण असेल फक्त एकच अट, इथे करा खरेदी

iPhone 16 Flipkart Discount Offer : आयफोन 16 आता फ्लिपकार्टवर केवळ ४१,९९० रुपायांमध्ये मिळणार आहे. जुना मोबाईल एक्सचेंज केल्यास ही जबरदस्त सवलत मिळणार आहे.

Saisimran Ghashi

iPhone 16 Discount Offer : स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलचा नवाकोरा iPhone 16 आता फ्लिपकार्टवर तब्बल 42,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागते मोबाईल एक्सचेंज ऑफर!

iPhone 16 किंमत आणि ऑफर्स

iPhone 16 ची मूळ लाँचिंग किंमत होती 79,900 रुपये. सध्या फ्लिपकार्टवर त्यावर 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे किंमत होते 74,900 रुपये.

यावरच जर तुम्ही Flipkart Axis बँकेचा क्रेडिट कार्ड वापरला, तर अजून 6120 पर्यंत अतिरिक्त सूट मिळते. यामुळे किंमत होते 68,780 रुपये. पण खरी धमाकेदार ऑफर येथेच सुरू होते

एक्सचेंज ऑफर

Flipkart द्वारे सध्या एक विशेष एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे, ज्यामध्ये तुमच्या जुन्या फोनच्या किंमतीशिवाय आणखी 8,000 चा अतिरिक्त डिस्काउंट मिळतो.

उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे iPhone 13 असेल आणि त्याची एक्सचेंज व्हॅल्यू सुमारे 30,700 रुपये असेल, तर

  • iPhone 16 वर 5,000 डिस्काउंट

  • Flipkart Axis कार्डवर 2,210 ची सूट

  • iPhone 13 एक्सचेंज व्हॅल्यू 30,700 रुपये

  • व त्यावर 8,000 रुपयेची अतिरिक्त सूट

हे सर्व एकत्र केल्यावर iPhone 16 ची प्रभावी किंमत होते फक्त 41,990! म्हणजेच, एकूण 45,910 रुपयेची बचत जवळपास अर्ध्या किमतीत iPhone 16 खरेदी करण्याची सुवर्णसंधी.

ही ऑफर सर्व फोनसाठी नाही

जुना कोणताही स्मार्टफोन एक्सचेंज करता येतो, पण 8,000 रुपयेची अतिरिक्त सूट फक्त अशाच डिव्हाइसेससाठी मिळते ज्यांची एक्सचेंज व्हॅल्यू 15,000 पेक्षा जास्त आहे.
याखालील प्रमाणे सवलती लागू होतात:

  • 3,000 – 10,000 ची व्हॅल्यू: 3,000 सूट

  • 10,001 – 15,000: 5,000 सूट

  • 15,001 पेक्षा जास्त: 8,000 सूट

iPhone 16 का आहे ‘वॅल्यू फॉर मनी’?

  • A18 Bionic चिपसेट

  • 6.1 इंच OLED डिस्प्ले

  • 48MP मुख्य कॅमेरा + 12MP अल्ट्रा-वाइड

  • नवीन कॅमेरा कंट्रोल बटण

  • Ceramic Shield ग्लास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT