Apple
Apple google
विज्ञान-तंत्र

ट्रॅकिंगपासून बचावासाठी Appleचे नवीन प्रायव्हसी फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

जगप्रसिध्द स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple ने अलीकडेच वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2021 मध्ये iOS 15, iPadOS 15, macOS आणि watchOS 8 ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केल्या आहेत.

जगप्रसिध्द स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple ने अलीकडेच वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2021 मध्ये iOS 15, iPadOS 15, macOS आणि watchOS 8 ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केल्या आहेत. या सर्वांमध्ये अपग्रेड केलेल्या फीचर्ससोबतच प्रायव्हसी फीचर्स देखील दिले गेले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांचा पर्सनल डेटा आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असेल. आज आपण Apple च्या या नवीन प्रयाव्हसी फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. (apple new privacy features and intelligent tracking prevention tool)

Appleचे मेल प्रायव्हसी प्रोटेक्शन फीचर

वापरकर्त्यांना नवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या मेल अॅपमध्ये प्रायव्हसी प्रोटेक्शन फीचर देण्यात आले आहे. या फीचरची खास गोष्ट ही आहे की हे ई-मेल पाठविणार्‍यास अदृश्य पिक्सेलद्वारे वैयक्तिक डेटा कलेक्ट करण्यापासून रोखते. इतकेच नाही तर हे फीचर मेल पाठवणाऱ्यास ई-मेल केव्हा उघडला गेला ते पाहण्यापासून देखील रोखते. तसेच, या फीचरच्या मदतीने आयपी अड्रेस देखील लपविला जाईल.कंपनीचे मुख्य लक्ष वापरकर्त्यांची प्रायव्हसी जपणे हे आहे अशे Apple कडून सांगण्यात आले. कंपनीने पुढे म्हटले आहे की आम्ही दरवर्षी नवीन तंत्रज्ञान वापरुन नवीनतम ऑपरेटिंग सिस्टममध्ये बरीच खास सुरक्षा फीचर्स दिली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित होईल.

इंटेलिजेंट ट्रॅकिंग प्रिव्हेंशन

Apple कंपनीच्या म्हणण्यानुसार, सफारी ब्राउझरमध्ये इंटेलिजेंट ट्रॅकिंग प्रिव्हेंशन टूल (Intelligent Tracking Prevention) देण्यात आले आहे. याद्वारे, वापरकर्ते त्यांचा आयपी अड्रेस लपवू शकतील आणि त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील. कंपनीचा असा विश्वास आहे की जेव्हा इंटेलिजेंट ट्रॅकिंग प्रिव्हेंशन टूल सुरु केले जाते तेव्हा कोणीही त्या सिस्टीमच्या आयपी अड्रेसचा दुरुपयोग करू शकणार नाही. यामुळे वापरकर्त्यांस ट्रॅक करणे शक्य नाही, तसेच वापरकर्त्यांचा डेटा देखील सुरक्षित राहील.

ios 15 चे फीचर्स

डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2021 कार्यक्रमात iOS 15 ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले गेले आहे. IOS 15 ही एक उत्कृष्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे. या ओएसमध्ये बर्‍याच नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्याचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहील.

नोटिफीकेशन फीचर - iOS 15 ऑपरेटिंग सिस्टममध्ये नोटिफीकेशन पुन्हा नव्याने डिझाइन केल्या आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना मोठे आयकॉन आणि कॉन्टॅक्ट फोटो देखील पाहाता येईल. याशीवाय वापरकर्त्यांना systemwide DND मोड चा सपोर्ट देखील मिळेल.

iMessage - iOS 15 च्या iMessage मध्ये, वापरकर्ते मजकूर तसेच व्हिडिओ आणि फोटो देखील सहज शोधू शकतील. वापरकर्त्यांना यामध्ये Apple न्यूज, म्यूजिक, फोटोज, सफारी, पॉडकास्ट पाहता येईल. यासोबतच आय-मेसेजमध्ये चॅट पिन करण्याचा पर्यायही असेल.

(apple new privacy features and intelligent tracking prevention tool)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT