Apple AirPods india eSakal
विज्ञान-तंत्र

Apple AirPods : आता संपूर्ण जगात मिळतील 'मेड इन इंडिया' एअरपॉड्स! हैदराबादमध्ये होणार उत्पादन, अ‍ॅपलचा मोठा निर्णय

Foxconn : फॉक्सकॉन कंपनी अ‍ॅपलच्या आयफोनसह अन्य कित्येक उत्पादनांची निर्मिती करते.

Sudesh

अ‍ॅपल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयफोननंतर अ‍ॅपलच्या 'एअरपॉड्स'चं उत्पादन देखील आता भारतात होणार आहे. लवकरच फॉक्सकॉनच्या हैदराबादमधील फॅक्टरीत Apple AirPodsचं उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.

फॉक्सकॉन कंपनी अ‍ॅपलच्या आयफोनसह अन्य कित्येक उत्पादनांची निर्मिती करते. हैदराबादमधील प्लांटसाठी फॉक्सकॉनने यापूर्वीच 400 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी मंजूरी दिली आहे. 2024 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत याठिकाणी उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या हवाल्याने आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एअरपॉड्सचं खास फीचर

अ‍ॅपलचे एअरपॉड्स टीडब्ल्यूएस हे भारतासह जगभरात प्रसिद्ध आहेत. यामध्ये उत्कृष्ट नॉईज कॅन्सलेशन फीचर आणि उत्तम साऊंड क्वालिटी देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या कानाच्या आकारानुसार आवाज ट्यून करण्याचं विशेष फीचरही यात देण्यात आलं आहे.

जगभरात प्रसिद्धी

ग्लोबल TWS मार्केटमध्ये अ‍ॅपलच्या एअरपॉड्सचा शेअर 36 टक्के आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंगचे TWS हेडफोन (7.5 टक्के) आहेत. त्यानंतर श्याओमी (4.4 टक्के) आणि बोट (4 टक्के) या कंपन्यांचा क्रमांक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

Latest Marathi News Live Update : ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष पेटवून सत्तेची खुर्ची मजबूत करण्याचा सरकारचा डाव; वडेट्टीवारांचा आरोप

SCROLL FOR NEXT