Apple 5G Network
Apple 5G Network esakal
विज्ञान-तंत्र

iphone 5G Network: अखेर मुहूर्त निघाला! भारतात पुढील आठवड्यापासून iphone यूजर्ससाठी 5G सेवा सुरू

सकाळ डिजिटल टीम

Apple कंपनी भारतातील 5G यूजर्ससाठी पुढील आठवड्यापासून बहुप्रतिक्षित सॉफ्टवेअर अपग्रेड करणार आहे. Appleने iOS 16 बीटा सॉफ्टवेअर अपडेट पुश केल्यामुळे ही सेवा आता भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध केली जाईल. त्यामुळे आता एअरटेल आणि रिलायंस जिओचे ग्राहक iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE मॉडेलपैकी कोणत्याही 5G सेवेचा अनुभव घेण्यासाठी Apple च्या बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामचा वापर करू शकतात.

Apple बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम हा Apple ID असणाऱ्या प्रत्येकासाठी ओपन असणार आहे. साइन अप करताना बीटा सॉफ्टवेअर अॅग्रीमेंट स्वीकारणाऱ्या यूजर्सला या सॉफ्टवेअरचा लाभ घेता येणार आहे. Apple बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरकर्त्यांना प्री-रिलीझ सॉफ्टवेअर वापरण्याची संधी देतोय ज्यामुळे सॉफ्टवेअर अधिक व्यापकपणे उपलब्ध होण्यापूर्वी तुम्ही या सॉफ्टवेअरच्या फिचर्सचा अनुभव घेऊ शकता.

Apple कंपनीने यूजर्सना फिडबॅक देण्याचेही आवाहन केले आहे. जेणेकरून यूजर्सना येणाऱ्या समस्या ओळखत कंपनी त्यावर सोल्यूशन काढत हे सॉफ्टवेअर आणखी उत्तम करू शकेल. Apple बीटा सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश करण्यासाठी Apple यूजर्सना सिंप्ली त्यांच्या डिवाईसमध्ये एनरॉल करायचं आहे. तर एअरटेल आणि जिओ कस्टमरसाठी ही सेवा पुढल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.

Apple बीटा सॉफ्टवेअरचे सदस्य म्हणून, वापरकर्ते त्यांचा iPhone, iPad, Mac, Apple TV, HomePod mini किंवा Apple Watch सारख्या डिवाइसलाही एनरॉल करू शकतील. तसेच Appleने सांगितले की आयफोन वापरकर्त्यांसाठी प्रोग्राम आणि सॉफ्टवेअर दोन्ही विनामूल्य आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT