Apple announces a Valentine’s Day special festive cashback offer on popular products including iPhone, iPad, and Apple Watch for a limited period.

 

esakal

विज्ञान-तंत्र

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Apple Cashback Offer : MacBook Air सह अनेक प्रॉडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील अन् डिस्काउंट

Mayur Ratnaparkhe

Apple Launches Valentine’s Day Special Cashback Offer : तरूणाईचा सर्वात आवडता दिवस असणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ येत असताना, Apple India ने त्यांच्या काही लोकप्रिय प्रॉडक्ट्सवर फेस्टिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅकची घोषणा केली आहे.  अ‍ॅपल कडून अधिकृत भारतीय वेबसाइटद्वारे व्हॅलेंटाईन डे सेलची घोषणा करण्यात आली आहे.

 ज्यामध्ये iPhone 17 सीरिज, MacBook Air आणि Pro मॉडेल्स, iPads, AirPods व Apple Watch यासह अनेक प्रॉडक्ट्सवर उत्तम डील, डिस्काउंट आणि ऑफर दिल्या आहेत. थेट किमतीत कपात करण्याऐवजी, Apple खरेदीदारांना बँक सपोर्टेड कॅशबॅक ऑफर आणि डीलचा फायदा घेण्याची संधी देत ​​आहे.

MacBook Air ला 10 हजारांपर्यंतचा त्वरित कॅशबॅक मिळत आहे, ज्यामुळे आता त्याची किंमत 89 हजार 900 पर्यंत खाली येत आहे. या 13-इंच लॅपटॉपची मूळ किंमत 99 हजार होती. यासाठी ICICI, Axis आणि American Express सह विविध बँक कार्ड वापरून कॅशबॅकचा लाभ घेता येतो. कार्डहोल्डर चेकआउटच्यावेळी आपोआप डिस्काउंट पाहू शकतात.

तसेच अ‍ॅपल त्यांच्या व्हॅलेंटाईन डे फेस्टिव्ह ऑफरचा भाग म्हणून मॅकबुक प्रो लाइनअपवर देखील सवलत देत आहे. या १४ इंचाच्या लॅपटॉपची किंमत सुरुवातीला १६९,९०० रुपये होती, परंतु आता ऑफर कालावधीत तो १५९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

M4 चिपसेटसह १६ इंचाचा मॅकबुक प्रो आता २३९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जो त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी झाला आहे. जर तुम्ही या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या व्हॅलेंटाईनला एक चांगली आणि उपयुक्त भेट देऊ इच्छित असाल आणि तुमचे जर बजेट असेल, तर हा अ‍ॅपल सेल एक एक चांगला पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Playoff Race: राजस्थान की गुजरात? आज जो जिंकेल तो थेट अव्वल दोनमध्ये झेप घेणार; पाहा प्लेऑफचं नवं समीकरण

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Vidarbha News: सिहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; उभे धान पिक जमिनदोस्त; सिंदपुरी, मोहाडी खापा, मुरली, सोनेगांव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nagpur News: रेशीमबाग मैदान धावपटूंसाठी बंद!; प्रशासनाने सर्व गेटला कुलूप लावल्याने खेळाडू सरावापासून वंचित

Latest Marathi News Live Update : हैदराबादमध्ये ‘आयपीएस’च्या पत्नीची हत्या

SCROLL FOR NEXT