Apple Watch Saves Life eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Watch : अ‍ॅपल वॉचने पुन्हा केली कमाल! रक्तातील गाठ ओळखून वाचवला महिलेचा जीव, जाणून घ्या सविस्तर

मी जर वेळेत जागी झाली नसते, तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही; असं ही महिला म्हणाली.

Sudesh

अ‍ॅपलच्या स्मार्टवॉचने आतापर्यंत बऱ्याच जणांचे प्राण वाचवले आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. एका २९ वर्षीय महिलेचे प्राण या वॉचमुळे वाचले आहेत. ही महिला झोपली असताना तिच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले होते. त्यामुळे या वॉचने अलर्ट करत तिला जागे केले.

किम्मी वॅटकिन्स असं या महिलेचं नाव आहे. ती झोपलेली असताना तिच्या हृदयाचे ठोके मोठ्या प्रमाणात वाढले होते. तिचा हार्ट रेट ही तब्बल १७८ बीट्स प्रति मिनिट एवढी झाली होती. सुमारे दहा मिनिटं एवढाच हार्ट रेट राहिल्यामुळे अ‍ॅपल वॉचने अलार्म वाजवून तिला जागं केलं.

यानंतर तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. याठिकाणी तपासणी केल्यानंतर समजलं, की तिला सॅडल पल्मनरी इम्बॉलिजम हा आजार आहे. या आजारामध्ये रक्ताच्या गाठी होतात, ज्यामुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

स्वतःला समजते नशीबवान

"मला झोपण्यापूर्वी चक्कर आल्यासारखं होत होतं. त्यामुळे मी झोपायला गेले. त्यानंतर सुमारे दीड तासांनी माझ्या अ‍ॅपल वॉचच्या अलार्ममुळे मला जाग आली. यात मला दिसलं की १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती गंभीर होती. मी स्वतःला फार नशीबवान समजते. मी जर वेळेत जागी झाली नसते, तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही." अशा शब्दांमध्ये या महिलेने आपलं मत व्यक्त केलं.

अ‍ॅपल वॉच आणखी स्मार्ट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या WWDC कार्यक्रमात अ‍ॅपल वॉचसाठी नवीन सॉफ्टवेअर लाँच केलं आहे. यामध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही जास्त लक्ष देण्यात येणार आहे. वॉचओएसच्या नवीन अपडेटमध्ये मूड आणि इमोशन ट्रॅकिंग हे फीचर्स देण्यात आले आहेत. यातील माइंडफुलनेस या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स त्यांच्या क्षणिक भावना आणि दैनंदिन मूड यांचा ट्रॅक ठेऊ शकतात. जेणेकरून कोणत्या गोष्टीचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो याबाबत ते अधिक जागरूक होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT