Artificial Intelligence sakal
विज्ञान-तंत्र

Artificial Intelligence : खोटी कारणे सांगून ऑफिसमधून सुट्टी घेताय, सावधान...! आता AI ओळखणार चक्क आजार

आता Artificial Intelligence चक्क आजार ओळखणार आहे. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे, पण हे खरंय.

निकिता जंगले

Artificial Intelligence: अनेकजण दररोजच्या ऑफीसला कंटाळून खोटी कारणे देत सुट्टी घेतात. कोणी आजारी पडल्याचं सांगतात. अचानक सर्दी खोकल्याची कारणे देतात पण आता आजारांची खोटी कारणे देणे तुम्हाला बंद करावी लागणार आहे कारण आता Artificial Intelligence चक्क आजार ओळखणार आहे.

तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. (Artificial Intelligence will identify your disease if you are taking fake sick leaves)

सुरतमधील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जर्मनीच्या रेनिश युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सद्वारे केल्या गेलेल्या संशोधनानुसार आजार ओळखण्याचं तंत्र शोधलंय.

याद्वारे जर सर्दी खोकल्याची कारणे देऊन कोणी आजारी असल्याचे सांगत असेल तर या नव्याने शोधलेल्या तंत्रानुसार त्यांच्या आवाजावरुन त्यांना खरंच सर्दी खोकला आहे की नाही, हे ओळखता येणार. त्यांनी या तंत्रावर प्रयोग केलाय. त्यात त्यांना ७० टक्के अचूकता दिसून आली.

त्यामुळे आता एआय अनेकांच्या आयुष्यात अडथळा निर्माण करण्याच्या तयारीत आहे आणि खोटी कारणे देऊन सुट्टी घेणाऱ्यांसाठी हा चांगला चोप आहे. त्यामुळे आता पुढे सर्दी खोकला किंवा कोणत्याही आजाराचे खोटे कारण देऊन सुट्टी मागत असाल तर वेळीच सावधान व्हा नाहीतर या नवीन तंत्रामुळे तुमचा जॉबही जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Mango : गुजराती आंब्याला हापूसचा दर्जा? कोकणी हापूस अस्तित्वावरून अधिवेशनात भास्कर जाधव आक्रमक, कोकणी मंत्र्यांची खरडपट्टी

शत्रुघ्न सिन्हा Vs जया बच्चन! 'तुम्ही खुप चांगल्या पँन्ट, शर्ट घालतात, मला फार आवडतात' अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Goa Tourism: गोव्यात न्यू इअर साजरा करायचा प्लॅन? या नाईटलाइफ स्पॉट्सल नक्की भेट द्या!

Arjun Tendulkar: यशस्वी जैस्वालने सांगितला अर्जुन तेंडुलकरचा ‘छंद’; ड्रेसिंग रूममधील वर्तणुकीबाबतही केला खुलासा…

Railway Loco Pilot Demands : इंडिगो प्रमाणे भारतीय रेल्वे देखील ठप्प होणार? लोको पायलट्सच्या 'या' मागणीने प्रवाशांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT