object coming to the earth google
विज्ञान-तंत्र

अवकाशातून आलेली 'ती' वस्तू पहिलीच नव्हे...

Oumuamua च्या तीन वर्षे आधी म्हणजेच २०१४ साली आणखी एक वस्तू अशाप्रकारे पृथ्वीवर आली होती.

नमिता धुरी

मुंबई : २०१७ साली सूर्यमालेच्या बाहेरून आलेल्या एका वस्तूने जगभरातील शास्त्राज्ञांच्या आणि सामान्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. अशाप्रकारे बाहेरच्या जगातून येऊन पृथ्वीच्या इतक्या जवळ पोहोचणारी Oumuamua ही पहिली वस्तू आहे असं किमान त्या वेळी तरी वाटत होतं; मात्र तो समज आता खोटा ठरतो आहे.

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, Oumuamua च्या तीन वर्षे आधी म्हणजेच २०१४ साली आणखी एक वस्तू अशाप्रकारे पृथ्वीवर आली होती. पपुआ न्यू गिनिका येथे या वस्तूने पेट घेतला व अवकाशातील हा कचरा प्रशांत महासागरात कोसळला. ही वस्तू आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील असल्याचे हावर्ड विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी सांगितले होते. त्यांच्या म्हणण्याला आता अमेरिकी संशोधन संस्थेने दुजोरा दिला आहे.

२०१४ साली आलेली ही वस्तू आंतरतारकीय अवकाशातून पृथ्वीवर आलेली तसेच अन्य तारकमालेतून येऊन पृथ्वीवर धडकणारी पहिली वस्तू होती. ही वस्तू पृथ्वीपासून काही अंतरावर असली तरीही अवकाशातील कचरा महासागरात टाकण्याएवढी मोठी होती.

हावर्ड विद्यापीठामध्ये अवकाशभौतिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी अमिर सिरज आणि विज्ञानाचे कनिष्ठ प्राध्यापक अब्राहम लोएब यांना या संशोधनाचे श्रेय देण्यात आले आहे. अशाप्रकारेच परक्या तारकामालिकेतून आलेली वस्तू याआधी पृथ्वीवर आल्याचे कळल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. समुद्राचा तळ खरवडून आपल्याला त्या वस्तूचे काही अवशेष मिळू शकतात का याची माहिती मी घेतो आहे, असे अमिरने सांगितले. बाहेरून पृथ्वीवर येणाऱ्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतींमुळे योग्य निष्कर्ष निघण्यास विलंब झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT