भारतात 5G स्मार्टफोनबाबत बरीच क्रेझ आहे. प्रत्येकजण सध्या नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत आहे. पण 5G स्मार्टफोन खरेदी करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांची नवीन स्मार्टऱोन बाजारात आणण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे .
भारतात 5G स्मार्टफोनबाबत बरीच क्रेझ आहे. प्रत्येकजण सध्या नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत आहे. पण 5G स्मार्टफोन खरेदी करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांची नवीन स्मार्टऱोन बाजारात आणण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे . यात कमी किमतीच्या 5G स्मार्टफोनचा देखील समावेश आहे, जे भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन खास लॉन्च केले जात आहेत. पण ग्राहकांनी स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करणे टाळले पाहिजे. भारतीयांनी स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी का करू नयेत याची कारणे आपण जाणून घेणार आहोत. (avoid to buy new 5g phone in india these 5 reasons became trouble)
5 जी स्पेक्ट्रमचे वाटप
रिलायन्स जिओ आणि एअरटेलने 5G सेवा जाहीर केली आहे. परंतु अद्याप त्याच्या रोलआउटमध्ये उशीर होण्याची शक्यता आहे कारण अद्याप 5 जी स्पेक्ट्रमचे वाटप झाले नाही. अशा परिस्थितीत 2021 च्या मध्यापर्यंत भारतात 5G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या 5G नेटवर्क भारतात अस्तित्वात नाही. 5G नेटवर्क दोन फ्रिक्वेन्सी बँडला सपोर्ट देते त्यापैकी एकसब-6 GHz आहे आणि दुसरे एक हाय फ्रिक्वेन्सी मिलिमीटर वेव्ह आहे, ज्यास 100Ghz आणि त्याहून अधिकची आवश्यक आहे. ज्याचा लिलाव होणार आहे. आपण 5G स्मार्टफोन विकत घेतल्यास, आपल्याला अद्याप 4G नेटवर्कवरून ऑपरेट करावे लागेल.
5G रोलआउटला वेळ लागेल
5 जी नेटवर्कची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी गेल्या 2 वर्षात बरीच कामे केली गेली आहेत. परंतु 5 जी च्या रोलआउटमध्ये अद्याप बराच कालावधी लागेल. 4 जी हे नेटवर्क देखील सुरुवातीला काही निवडक प्रदेशात लाँच केले गेले होते. अशा परिस्थितीत काही निवडक शहरांसाठी 5 जी देखील सुरू केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी 5 जी स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी थोडी वाट पाहणे चांगले होईल. तसेच, 5G ला खेड्यांमध्ये आणि लहान शहरांमध्ये पोहोचण्यास कित्येक वर्षे लागू शकतात.
वापरकर्त्यांसाठी 5G प्लॅन असेल बजेटच्या बाहेर
आपण साधा स्मार्टफोन वापरणारे असल्यास आणि आपण स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण सुरुवातीला 5G प्लॅन खूप महाग असतील. अशा परिस्थितीत 5 जी रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांसाठी खूप महाग असू शकतो.
स्वस्त फोनमध्ये हवे ते फीचर नसतील
स्मार्टफोन निर्माता कंपन्या स्वस्त 5G फोनमधील अनेक फीचर्सबद्दल बऱ्याच प्रमाणात तडजोड करतात. यात युजर्सला प्रोसेसर, कमी दर्जाचे कॅमेरा सेन्सर, छोटी बॅटरी देण्यात येते. अशा परिस्थितीत 5G स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा 4G स्मार्टफोन खरेदी करणे चांगले आहे. कारण 5 जी स्मार्टफोनचे खराब फीचर्स पुढील 2 वर्षात निरुपयोगी ठरतील.
5 जी टेक्नोलॉजी अपडेट केली जाईल
5G नेटवर्क येण्यास वेळ लागेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही आत्ताच नवीन स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करणार असाल, तर भारतात 5G नेटवर्क सुरू होईपर्यंत 5G तंत्रज्ञान कालबाह्य होईल. अशा परिस्थितीत आपले पैसे वाया जातील.
(avoid to buy new 5g phone in india these 5 reasons became trouble)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.