Jio, Airtel, Vi prepaid Plans
Jio, Airtel, Vi prepaid Plans 
विज्ञान-तंत्र

Jio, Airtel आणि Vi चे 3GB डेली डेटा प्लॅन, मिळेल फ्री कॉलिंगसह बरंच

सकाळ डिजिटल टीम

Best Prepaid Plans : Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे सध्या अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये हाय-स्पीड डेटा आणि फ्री कॉलिंग सारखे फायदे दिले जात आहेत. जर तुम्हाला तुमच्यासाठी त्यामधून चांगला प्लॅन निवडणे अवघड जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. आज आपण अशा प्रीपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला दररोज ३ GB पर्यंत डेटा मिळेल आणि प्रीमियम अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल आणि महत्वाचे म्हणजे या सर्व प्लॅनच्या किंमती ६०० रुपयांपेक्षा कमी आहेत.

Jio चा ४१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या या प्रीपेड प्लानची किंमत ४१९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते आणि त्यासोबत यूजर्सला दररोज ३ जीबी डेटासह १०० एसएमएस दिले जातील. यासोबतच यूजर्सना फ्री कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. याशिवाय वापरकर्ते Jio TV, Movies, Cloud आणि Security सारखे अॅप वापरू शकतील.

Airtel चा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलचा हा प्रीपेड प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याची किंमत ५९९ रुपये आहे. यामध्ये यूजर्सना दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतील. याशिवाय युजर्सना प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम आणि विंक म्युझिक सारख्या अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. या प्रीपेड प्लॅनची ​वैधता २८ दिवसांची आहे.

Vi चा ४७५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea चा हा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज ३ GB डेटा आणि १०० SMS मिळणार आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाईल. याशिवाय यूजर्स व्होडाफोन आयडियाचे प्रीमियम अॅप्स वापरू शकतील. याशिवाय रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना बिंज ऑल नाईट आणि डेटा रोलओव्हर सारख्या सेवा दिल्या जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT