best selling electric car Tata nexon ev crossed 13500 units sales 
विज्ञान-तंत्र

ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात नागिरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. Tata Motors च्या इलेक्ट्रिक SUV Nexon EV ने विक्रीत एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लॉन्च झाल्यापासून 2 वर्षात या इलेक्ट्रिक वाहनाने 13,500 युनिट्सपेक्षा जास्त विक्रीचा आकडा पार केला आहे. एप्रिल 2021 मध्येच कंपनीने सांगितले होते की, कारचे चार हजार युनिट्स विकले गेले आहेत. अशा प्रकारे, एकूण 10 महिन्यांत, Nexon EV ने 9000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

सध्या, Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. त्याची दर महिन्याला सुमारे एक हजार युनिट्सची विक्री होते. टाटा मोटर्सची ही पहिली इलेक्ट्रिक कार होती, जी खाजगी खरेदीदारांसाठी बाजाराच आणली गेली होती. दरम्यान Tata Nexon EV ची किंमत 14.29 लाख ते 16.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

310KM पेक्षा जास्तची रेंज

Tata Nexon EV मध्ये , कंपनीने 30.2 kWh क्षमतेचा लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फास्ट चार्जिंग सीस्टीमसह केवळ 1 तासात 80% पर्यंत चार्ज होते. तर नियमित चार्जरने या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात.

या कारची इलेक्ट्रिक मोटर 127 bhp आणि 245 Nm पीक टॉर्कसाठी ट्यून केली गेली आहे. याचा सर्वाधिक वेग 120 किमी प्रतितास असून तो 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या कारचा बॅटरी पॅक IP67 रेटेड वॉटर रेझिस्टंट आहे. कंपनी त्यांच्या बॅटरीवर 8 वर्षे / 1.6 लाख किमी. पर्यंत वॉरंटी देखील ऑफर करते. Nexon EV तीन कलर ऑप्शन्समध्ये उपवब्ध आहे सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि मूनलाईट सिल्व्हर. अलीकडेच, कंपनीने एक डार्क एडिशन देखील सादर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Deepotsav Controversy : ‘’दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत, हे दाखवण्यापर्यंत सरकार...’’ ; मनसेचा आरोप!

ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! Blessing Muzarabani ने मोडला मोहम्मद सिराजचा विक्रम

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारतात आणणार! मुंबईतील 'या' तुरूंगात होणार रवानगी, कशी असणार सुविधा?

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : कोलकाता ते श्रीनगर इंडिगो 6E6961 विमानाचे इंधनाच्या समस्येमुळे वाराणसीमध्ये लँडिंग

SCROLL FOR NEXT