Smartwatch
Smartwatch Sakal
विज्ञान-तंत्र

Best in 2022: 'या' ५ स्मार्टवॉचला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लागली रांग, किंमत तुमच्या बजेटमध्ये

सकाळ डिजिटल टीम

Best Smartwatches Under 5000 In India: नियमित वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉच खरेदी करण्याला ग्राहक प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते. स्मार्टवॉचमध्येच अनेक वेगवेगळे फीचर्स दिले जातात. विशेष म्हणजे अवघ्या ५००० रुपयांच्या बजेटमध्ये अनेक शानदार स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये यावर्षी लाँच झालेल्या सर्वोत्तम स्मार्टवॉचविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Wrong Fuel In Bike: गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

OnePlus Nord Watch

OnePlus Nord Watch

OnePlus Nord Watch स्मार्टवॉचला तुम्ही ४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही वॉच एमोलेड डिस्प्लेसह येते. यामध्ये मल्टी वॉच फेसेस, स्पोर्ट्स मोड, १० दिवसांची दमदार बॅटरी सारखे अनेक शानदार फीचर्स मिळतील. याशिवाय SpO2, हार्ट रेट, स्ट्रेस मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स देखील यात दिले आहेत.

Realme Watch 3

ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणारी वॉच शोधत असाल तर Realme Watch 3 चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला ७ दिवसांची दमदार बॅटरी लाइफ मिळेल. याशिवाय, इतरही हेल्थ फीचर्स यात दिले आहेत. रियलमीच्या या वॉचची किंमत ३,४९९ रुपये आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Amazfit Bip 3

Amazfit Bip 3

Amazfit Bip 3 मध्ये १० दिवसांची दमदार बॅटरी दिली आहे. यात स्लीप ट्रॅकर, हार्ट रेट, SpO2 आणि स्पोर्ट्स मोड्स सारखे फीचर्स मिळतील. वेगवेगळ्या हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचला तुम्ही ३,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

Redmi Watch 2 Lite

Redmi Watch 2 Lite ने काही महिन्यांपूर्वीच आपल्या या शानदार स्मार्टवॉचला लाँच केले आहे. अवघ्या ३,४९९ रुपये किंमतीच्या या वॉचमध्ये SpO2 ट्रॅकर, स्ट्रेस-स्लीप मॉनिटरिंग, ५एटीएम वॉटर-रेसिस्टेंट बिल्ट, १२० पेक्षा अधिक वॉच फेसेस यात दिले आहेत.

Fire-Boltt Ring 3

Realme Watch 3 प्रमाणेच Fire-Boltt Ring 3 मध्ये देखील तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंग आणि मल्टीपल वॉच फेसेसचा सपोर्ट मिळेल. यामध्ये वॉइस असिस्टेंट, बिल्ट-इन कॅलक्यूलेटर आणि गेम्ससह अनेक हेल्थ फीचर्स मिळतील. वॉचची किंमत फक्त २,९९९ रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT