cctv hackers.jpg
cctv hackers.jpg 
विज्ञान-तंत्र

सावधान! तुमच्याच CCTV तून तुमच्यावरच ठेवली जातेय पाळत; अशी घ्या खबरदारी

ज्योती देवरे

नुकत्याच अमेरिका देशातील वॉशिंग्टन शहरात काही हॅकर्सने दिड लाख सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याची घटना समोर आली. तसेच धक्कादायक बाब म्हणजे शाळांमधील लाइव्ह फीडही मिळवले असल्याचा माहिती समजली. या हॅकिंगमुळे अमेरिकेत खळबळ माजली. तसेच हॅकर्सने महिला रुग्णालयातील आतील दृष्येही हॅक केल्याचे समजले. यावरूनच आता सीसीटिव्हीची सुरक्षा धोक्यात आली आहे. आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावलेला सीसीटीव्ही सुरक्षित आहे असा अनेकांचा समज होता. पण हाच समज आता गैरसमज सिध्द झालाय. कारण आता तुमच्याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुमच्यावरच पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

सीसीटीव्ही वापरताय... सावधान! सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट सांगतात...

आता सायबर गुन्हेगारांची सीसीटीव्हीवरही नजर पडू लागलीय. सायबर गुन्हेगार सीसीटीव्ही हॅक करु लागलेत. खबरदारी म्हणून सीसीटीव्ही इन्स्टॉल करताना काही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालीय. CCTV चा वापर हा आपल्या घरातील ऑफिस मधील किंवा संस्थेमधील महत्त्वाच्या गोष्टी चोरी अथवा त्यांची हानी होऊ नये याच्यासाठी बसवले जातात. सीसीटीव्हीचे फोटो, व्हिडिओ तसेच ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याची क्वालिटी सुद्धा उत्तम प्रकारांची असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत सुद्धा होत असते. ज्यांना सीसीटीव्हीचे बजेट परवडत नाही ते मोबाईलचा उपयोग करून सुद्धा अशा प्रकारची सुरक्षा वापरत असतात. सीसीटीव्ही वापरत असताना हा एक कायदेशीर पुरावा ठरू शकतो. म्हणून त्यांना एका विशिष्ट व सुरक्षित जागेवर ती लावण्यात आले पाहिजे. कुठलाही गैर प्रकार घडलेला असल्यास त्याचा योग्य पद्धतीने पुरावा गोळा करणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. सीसीटीव्हीने कॅप्चर झालेले फोटो अथवा व्हिडिओची क्वालिटी क्लिअर नसेल तर सायबर फोरन्सिक एक्सपर्टच्या माध्यमातून तो व्यक्ती चेहरा तसेच उंची अथवा आजुबाजूचे ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करून गुन्ह्याला आळा घालण्यास मदत होते.  - तन्मय दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ञ

काय खबरदारी घ्याल?

-सीसीटीव्ही वापरत असाल तर इंटरनेटला कनेक्ट झाल्यावर जगातून कुठल्याही कानाकोपर्‍यातून हॅकर्स क्रिमिनल्स सीसीटीव्ही हॅक करू शकतात म्हणून सीसीटीव्ही वापरण्यासाठी ठराविक आयपी ऍड्रेस अथवा युजरनेम पासवर्डचा वापर होणे आवश्यक आहे.

- सीसीटीव्ही ॲक्सेस मिळतो अथवा तो आयपी एड्रेस असो अथवा डोमेन नेम असो त्याचे सतत मॉनिटर इन करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणी तेथे लॉगिन करायचा प्रयत्न करत असल्यास त्याचा लोक आपल्याला सहजरीत्या मिळू शकतो.

-सीसीटीव्ही ज्या कंपनीचा आहे. त्यांचे वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक आहे.

-अनोळखी आयपी ऍड्रेस वरून कोणीही लॉगिन करायचा प्रयत्न सतत करत असल्यास तो आयपी ॲड्रेस ब्लॉक करणे महत्त्वाचे आहे

-जो डेटा लाईव्ह स्पीड होत आहे तो टू इंक्रिप्ट असणे सुद्धा आवश्यक आहे.

-टू स्टेप ऑफ व्हेरीफिकेशनचा ओटीपी आल्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे शक्यतो ॲक्सेस करू नये.


(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT