mars black beuty
mars black beuty esakal
विज्ञान-तंत्र

मंगळावरच्या कोणत्या भागातून आला होता ब्लॅक ब्युटी..जाणून घ्या खरा पत्ता

सकाळ डिजिटल टीम

खूप वर्षाअगोदर पृथ्वीवर एक उल्कापिंड पडला होता. त्याची जेव्हा तपासणी झाली तेव्हा अस कळलं की हा उल्का मंगळ ग्रहावरुन आला आहे. त्याचं आयुष्य हे जवळपास 450 कोटी वर्षे आहेत. परंतु आता वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर या उल्कापिंडाची उत्पत्ती जिथे झाली होती, बरोबर त्या जागेचा शोध लागला आहे. या उल्कापिंडाचे नाव आहे .

"ब्लॅक ब्युटी"(Black Beauty Meteorite) या शोधामुळे वैज्ञानिकांना आता वाटू लागले आहे की, पृथ्वी, मंगळ आणि सौर मंडळातील अन्य ग्रहांच्या जन्माचे रहस्य या गोष्टीमुळे समोर येऊ शकते.Blacku ब्युटी उल्कापिंडाचे वजन 320 ग्राम ऐवढे आहे. शास्रीय भाषेत याला NWA 7034 म्हणून ओळखले जाते.याचा शोध घेण्याचा प्रयत्न 2011 मध्ये मोरक्कोमध्ये झाला होता. याच्यासोबत आणखी 300 दगड आकाशातून पृथ्वीवर पडले होते. पण हा दगड ऐकमेव होता जो मंगळ ग्रहावरुन सरळ पृथ्वीवर आला होता. कदाचित मंगळ ग्रहावरील अंतर्गत टक्करीमुळे या दगडाचा तुकडा वेगळा झाला असावा.

Khujirt Crater

याच्या आधी जे संशोधन झाले होते त्याच्यानुसार ब्लॅक ब्युटी हा पृथ्वीवर सगळ्यात जुना असा दगड आहे, तो मंगळ ग्रहावरून आला आहे. हा पृथ्वीवर पडलेल्या मंगळाच्या मातीचा उत्तम नमुना देखील आहे. यामध्ये एंगुलर फ्रैगमेंट्स आहेत. म्हणजे या दगडामध्ये काही धातु, काही खनिजे याचा देखील समावेश आहे. पण मंगळ ग्रहावरील इतर दगडांचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तो संपूर्ण दगड एकाच धातुचा बनलेला असतो. जेव्हा शास्रज्ञांनी त्या दगड पडलेल्या खड्डांच्या आकाराची आणि लोकेशनची पाहणी करताना त्यांना आजुबाजुला तसेच लहान मोठे खड्डे दिसून आले, ते जवळपास 3 किलोमीटर व्यास असलेले खड्डे होते. सगळ्यात महत्त्वाचे ते खड्डे 1 कोटी वर्षे जुने होते. यावरुन कळतं की, लहान गड्डे हे मोठे गड्डे तयार होऊन त्यातून जे दगड निघाले त्याचा तो परिणाम होता.

ब्लॅक ब्युटी हा मंगळ ग्रहाच्या 40 किलोमीटर व्यास असलेल्या Khujirt Crater मधुन निघलेला दगड आहे.हा मंगळ ग्रहाच्या दक्षिण गोलार्धात स्थिर आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ युनिवर्सिटी (Universities in Perth Australia) शास्रज्ञ लेखक एंथनी लगाइन यांनी सांगितले की, अजुनपर्यंत कोणत्याही शास्रज्ञांना ही गोष्ट माहिती नव्हती. पण जेव्हा सुधारीत तंत्रज्ञानाच्या आधारावर या गोष्टी समोर आल्या तेव्हा मग मी आणि माझ्या टिमने मंगळ ग्रहावरच्या या दगडांवर संशोधन करायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही तिथले सगळे गड्डे हे मोजूनमापून काढले. या सगळ्या संशोधनाच्या प्रकियेत आतापर्यंत 9.4 कोटी फोटो जमा झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT