Blue Ghost Moon Video esakal
विज्ञान-तंत्र

Blue Ghost Moon Video : ब्लू घोस्ट लँडरने अंतराळातून दाखवलं चंद्राचं नयनरम्य रूप; व्हिडिओ अन् फोटो पाहा एका क्लिकवर

Blue Ghost Moon Video : फायरफ्लाय एरोस्पेसचे ब्लू घोस्ट चंद्रावरून घेतलेले अद्भुत दृश्ये, चंद्राच्या खडबडीत व क्रेटरयुक्त भूपृष्ठ दाखवले आहे. २ मार्च रोजी मारे क्रिसियममध्ये उतरण्याची त्याची ऐतिहासिक मोहिम जवळपास पूर्ण होत आली आहे

Saisimran Ghashi

Blue Ghost Moon Video : चंद्राच्या कक्षेतून फिरणाऱ्या ब्लू घोस्ट लँडरने चंद्राचा नेत्रदीपक व्हिडिओ पाठवला असून, त्यातून या खडकाळ आणि विवरांनी भरलेल्या पृष्ठभागाचे सखोल निरीक्षण करता येत आहे. फायरफ्लाय एअरोस्पेसच्या या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत ब्लू घोस्ट २ मार्च रोजी चंद्रावर उतरण्यास सज्ज आहे.

१०० किमी उंचीवरून चंद्राचा अद्भुत नजारा

स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीने १५ जानेवारी २०२५ रोजी प्रक्षेपित झालेल्या या लँडरने १३ फेब्रुवारीपासून चंद्राच्या कक्षेत भ्रमण सुरू केले आहे. हे यान चंद्राच्या मारे क्रिसियम (Mare Crisium) नावाच्या सपाट खाचरात २ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ७:०४ वाजता उतरणार आहे.

नासाच्या कमर्शिअल लुनार पेलोड सर्व्हिसेस (CLPS) मोहिमेचा हा एक भाग असून, ब्लू घोस्ट चंद्रावर १० वैज्ञानिक उपकरणे पोहोचवणार आहे.

Blue Ghost Moon Video

चंद्राच्या दुर्लक्षित भागाचा अभ्यास

ब्लू घोस्टने पाठवलेल्या नव्या दृश्यांमध्ये चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाचाही समावेश आहे, ज्यामुळे चंद्राच्या भूगोलाबाबत वैज्ञानिकांना नव्या महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Blue Ghost Moon Video

ही मोहीम १४ दिवस चालणार असून, या काळात चंद्राच्या धुळीच्या (Regolith) रचनेचा तसेच सौर वाऱ्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जाईल. ही माहिती नासाच्या भविष्यातील आर्टेमिस मोहिमेसाठी उपयुक्त ठरणार आहे, ज्याद्वारे चंद्रावर मानवाला पुन्हा पाठवले जाणार आहे.

Blue Ghost Moon Video

चंद्र मोहिमांमध्ये वाढ

ब्लू घोस्टच्या व्हिडिओच्या काही तासांपूर्वीच स्पेसएक्सने इंट्यूटिव्ह मशीनच्या "अथेना" लँडरचे यशस्वी प्रक्षेपण केले. २०२५ मध्ये स्पेसएक्सच्या नेतृत्वाखाली हे तिसरे चंद्र लँडर प्रक्षेपण होते. याशिवाय, जपानी कंपनी इस्पेसचे "हाकुटो-R2" हे यान देखील चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे २०२५ हे वर्ष चंद्र मोहिमांसाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या या नव्या मोहिमा भविष्यातील मानवी वसाहतींसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

SCROLL FOR NEXT