Sim Card Home Delivery : भारत सरकारच्या स्वामित्वातील टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर सेवा सुरू केली आहे. आता बीएसएनएल सिमकार्ड मागवण्यासाठी ग्राहकांना दुकानात जाऊन रांग लावण्याची गरज नाही. कंपनीने ‘ऑनलाइन सिम ऑर्डर आणि घरपोच वितरण’ सेवा सुरू केली असून, ग्राहकांना घरबसल्या सिमकार्ड मिळवणे शक्य झाले आहे.
ही सेवा बीएसएनएलच्या 5G सेवांच्या सॉफ्ट लॉन्चनंतर सुरू करण्यात आली असून यामुळे कंपनीच्या डिजिटल युगातील विस्ताराला अधिक गती मिळणार आहे. सध्या बीएसएनएल देशभरात 4G आणि 5G नेटवर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.
ग्राहक https://sancharaadhaar.bsnl.co.in/BSNLSKYC/ या अधिकृत लिंकवर जाऊन स्वतःची KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सिम ऑर्डर केली जाऊ शकते.
या सेवेमध्ये ग्राहकांना खालील माहिती भरावी लागते
पिनकोड
नाव
पर्यायी मोबाईल क्रमांक
त्यानंतर सिम कोणी वापरणार आहे हे निवडता येते स्वतःसाठी, कुटुंबातील सदस्यासाठी किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी.
ही सेवा प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारच्या कनेक्शनसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी माहिती सबमिट केल्यानंतर, दिलेल्या पर्यायी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. यानंतर सिम वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
जर सिम ऑर्डर करताना कोणतीही अडचण आली, तर ग्राहक 1800-180-1503 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. बीएसएनएलने ग्राहकांना वेळेवर मदत देण्याची हमी दिली आहे.
बीएसएनएल सध्या देशभरात 1 लाख 4G टॉवर्स उभारण्याच्या तयारीत आहे, जी प्रक्रिया 2025 च्या जूनअखेर पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर, अनेक शहरांमध्ये Q-5G FWA (Fixed Wireless Access) सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. ही सेवा मासिक 999 मध्ये 100 Mbps स्पीडसह उपलब्ध आहे, जी इतर खासगी कंपन्यांच्या तुलनेत खूप स्वस्त आहे.
बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन्स खासगी कंपन्यांपेक्षा अधिक किफायतशीर असल्यामुळे, बीएसएनएल सिमची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कंपनीने आता घरपोच सिम वितरणाची सुविधा सुरू करून, ग्राहकांना अजून एक मोठा दिलासा दिला आहे.
एकंदरीत, BSNL ची ही नवी सेवा डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून घरबसल्या सिम मिळवण्याची सुविधा अनेक ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.