Car Black Film Windows esakal
विज्ञान-तंत्र

Car Black Film Windows : बंदी असतानाही गाड्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावता येते का? नियम काय सांगतो

बरेच लोक किंवा समजा की तरुण पिढी स्टाईल मारण्यासाठी त्यांच्या कारच्या काचांवर काळी फिल्म लावतात

सकाळ डिजिटल टीम

Car Black Film Windows : बरेच लोक किंवा समजा की तरुण पिढी स्टाईल मारण्यासाठी त्यांच्या कारच्या काचांवर काळी फिल्म लावतात. अशा लोकांना वाटतं की वाहनाच्या काळ्या काचा लावून क्लास मेन्टेन राहतो. काही वर्षांपूर्वी टिंटेड गाड्यांचा ट्रेंड आला होता.

सध्या कारच्या काळ्या काचांचा ट्रेंड खूप कमी झाला आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कारची काळी काच दिसली की पोलिस पावती फाडणार हे नक्की. म्हणजेच तुमच्या गाडीच्या काचा काळ्या असतील तर ते कायद्याच्या विरोधात आहे.

कारच्या काचांवर झिरो व्हिजिबिलिटी ब्लॅक फिल्म लावणं कायद्याने गुन्हा आहे, तो वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. यासाठी ट्रॅफिक पोलिस तुम्हाला अडवू शकतात आणि दंड भरायला लावू शकतात.

टिंटेड ग्लास

2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने टिंटेड ग्लास म्हणजेच कारच्या काळ्या काचेच्या प्रकरणी निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, तुमच्या कारच्या पुढील आणि मागील बाजूच्या आरशांची व्हिजिबिलिटी किमान 70 टक्के असावी. .

याशिवाय, बाजूच्या काचेच्या व्हिजिबिलिटी सांगायचे तर, त्याची व्हिजिबिलिटी किमान 50 टक्के असावी. जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर वाहतूक पोलिस तुम्हाला दंड भरायला लावू शकतात

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या कारच्या साइड मिररवर 50 टक्के व्हिजिबिलिटी असलेली ब्लॅक फिल्म लावू शकता. याशिवाय समोर आणि मागील आरशांवर 70 टक्के व्हिजिबिलिटी असलेली ब्लॅक फिल्म लावता येते. त्यानुसार आरशांवर फिल्म लावल्यास वाहतूक पोलिस तुम्हाला दंड करणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT