Car Buying Tips esakal
विज्ञान-तंत्र

Car Buying Tips : Second Hand कार्सवर वॉरंटी मिळते का? त्याचा फायदा होतो का?

वॉरंटी संपल्यावरही त्याचा काही फायदा होतो का?

Pooja Karande-Kadam

 Car Buying Tips : शेजाऱ्यांच्या दारात आली की आपल्याही दारात कार यावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे थोडे थोडे करून पैसे जमा करणारे लोक जेव्हा नव्या कारच्या किंमती ऐकतात तेव्हा त्यांच्या पदरी निराशाच पडते. अशावेळी सेकंड हॅंड कारचा पर्याय त्यांच्यापुढे असतो. जो स्वप्न पुर्ण करणारा आणि परवडणारा असतो.

गाडी जुनी असली तरी तिचा मेंटनन्स खर्च, तिचा विमा या सगळ्या गोष्टी घ्याव्याच लागतात. पण, नव्या गाड्यांप्रमाणे जुन्या गाडीलाही वॉरंटी मिळते का? याबद्दलच आज जाणून घेऊयात.  

नवीन गाड्या वॉरंटी कव्हरसह येतात. पण,  सेकंड-हँड वाहनांना वॉरंटी कव्हर नसतो. आणि वापरलेल्या कारसाठी वॉरंटी खरेदी करणे आवश्यक असते. अशी वॉरंटी केवळ काहीच कंपन्या प्रोव्हाइड करतात.

सर्वात आधी कारची वॉरंटी काय आहे, कशाप्रकारची असते हे पाहुयात. कार वॉरंटी म्हणजे वाहनाला सुविधा देण्याचा करार असतो. ज्यामध्ये कंपनी विशिष्ट काळापर्यंत गाडीचे तुटलेले भाग बदलण्याचे काम करते. वाहनाची वॉरंटी सर्व घटनांचा समावेश करत नाही. परंतु, वाहन वॉरंटीचे तीन प्रकार आहेत, Manufacturer's warranty, Dealership Warranty आणि  Extended warranty होय.

Manufacturer's warranty

बाजारात येणाऱ्या सर्वच कारवर कंपनी वॉरंटी असते. पण,सेकंड हँड कारसाठी हा ऑप्शन नाही. या वॉरंटीमध्ये ब्रेक पॅड, क्लच आणि प्रेशर प्लेट्स, इलेक्ट्रिक बल्ब आणि रबर पाईप्सचा समावेश होतो. भरधाव ड्रायव्हिंगमुळे गाडीचे नुकसान झाले तर ते या वॉरंटीमध्ये कव्हर केले जात नाही.

Dealership Warranty

डीलरशिप वॉरंटी वापरलेल्या कार डीलर्सने वॉरंटी कव्हरसह कार ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. जरी हे कंपनी वॉरंटीपेक्षा कमी फायदेशीर असले, तरीही ते गाडीच्या काही विशिष्ट भागांना वॉरंटी कव्हर देते. या वॉरंटीला काही अटी आणि नियम लागू असतात. त्याची तुम्ही माहिती करून घ्या. डिलरशिप वॉरंटी फक्त काही निवडक डिलर्सकडेच मिळते. तसेच डिलर या वॉरंटीसाठी काही विशिष्ट रकमेची मागणीही करू शकतो. पण, कंपनी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारत नाही.

Extended warranty

तुमची वॉरंटी संपल्यानंतरही काही ठराविक काळासाठी Extended warranty देतात. त्यामुळे दिर्घकालिन धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हा योग्य पर्याय आहे. जेव्हा तुमची वॉरंटी संपते तेव्हा ठराविक रक्कम अदा करून आपण ही वॉरंटी घेऊ शकतो. काही उत्पादक किंवा डीलरशिप ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी विस्तारित वॉरंटी पॅकेज विनामूल्य देतात.

Second Hand कारला वॉरंटी असते का?

वॉरंटीसह वापरलेल्या कार खरेदी केल्याने ब्रेकडाउन झाल्यास मोठा खर्च होण्याची शक्यता कमी होते. सेकेंड-हँड कार घेताना कारची वॉरंटी आधीच वापरली गेली असते. त्यामूळे तुमच्यामुळे गाडीचे काही नुकसान झाले तर त्यावेळी तुम्हाला या वॉरंटीचा फायदा होईल. Second Hand च्या वॉरंटीमध्ये स्टीयरिंग, ब्रेक्स, एक्झॉस्ट सिस्टीम इत्यादींची नुकसान भरपाई मिळते.

या वॉरंटीचे फायदे काय आहेत

सुरक्षा

एक सर्वसमावेशक कव्हरेज वॉरंटी ही सर्वोत्कृष्ट वॉरंटी आहे जी कोणी मागू शकते. सामान्य वॉरंटी प्लॅनमध्ये दुरुस्तीचा फक्त काही भाग समाविष्ट असतो किंवा ठराविक रकमेपुरता मर्यादित असतो.

गाडीचा अपघात झाल्यास वॉरंटी आपल्या कामी येते

बचत होते - इंजिन, ट्रान्समिशन, क्रँकशाफ्ट, टर्बोचार्जर यांसारख्या सदोष भागांसाठी सुमारे रु. 1 लाख किंवा अधिक आणि अधिक पैसे खर्च होऊ शकतात. पण, वॉरंटी असल्याने तुमचे अर्थिक नुकसान होत नाही.

फसवणुक होत नाही

कारचा अपघात झाला आणि तुम्ही गाडी स्थानिक व्यापाऱ्याला दिली. तर तो गाडीचे ओरिजिनल पार्ट बसवेल याची खात्री नसते. पण, तेच तुम्ही गाडी डिलरकडे दिलीत तर तो वॉरंटी असल्याने पार्टच्या क्वालिटीमध्ये फेरफार करत नाही. त्यामुळे वॉरंटी कधीही फायद्याचीच ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT