car price hike metal price increased impact of russia ukraine war on india  
विज्ञान-तंत्र

कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका: युद्धामुळे महागणार गाड्या

सकाळ डिजिटल टीम

ग्लोबल ऑटो इंडस्ट्रीमध्ये धातूंच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे ज्यामुळे वाहनांच्या किंमतीमध्ये सतत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रशिया-यूक्रेनच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कार उत्पादक संकटात अडकले आहेत. युक्रेनवर रशियावर आक्रमणामुळे कारामध्ये वापरले जाणाऱ्या धातूंच्या किंमतीमध्ये मोठी तेजी आली आहे.

कार बनविण्यासाठी अॅल्युमिनियम पासून कॅटलिटीक कन्वटर्समध्ये पलेडियम आणि इलेक्ट्रिक वाहन बॅटरीमध्ये निकेलचा (Nickel)मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पलेडियम सर्वात महाग धातू आहे आणि रशिया हा पलेडियमचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

धातूच्या वाढत्या किंमतीशिवाय पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे देखील ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसत आहे. यूक्रेनच्या संकटचा परिणाम कच्च्या तेलांवर झाला आहे. कच्च्या तेलांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली असून पेट्रोल डिझेलच्या किंमत अधिक वाढल्या आहेत. त्याशिवाय यूक्रेन संकटामध्ये सेमिकंडक्टर चीपची कमतरता होऊ शकते.

यूक्रेन नियॉनचा एक प्रमुख उत्पादक आहे, ज्यांचा उपयोग मायक्रोचिप्स बनविण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निऑनचे उत्पादन आणि पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

स्टेंलटिस सीईओ कार्लोस तवारेस यांनी सांगितले की, सद्य स्थितीमध्ये कच्च्या तेल आणि उर्जेच्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. हे ऑटो उद्योग क्षेत्राच्या व्यापारावर अधिक दबाव टाकू शकतो. हा दबाव ग्राहकांवरही होऊ शकतो अशी शक्यता आहे. परिणामी ग्राहकांना जास्त किंमतीमध्ये वाहन खरेदी करावी लागेल.

अॅल्यूमिनिअम आणि पॅलेडियम दोन्ही सोमवारी रेकॉर्ड उच्चतम पातळीवर पोहचला, ज्याचा उपयोग वाहन निर्मात्यांसाठी स्टेनलेस स्टील बनविण्यासाठी केला जातो. मगंळवारी पहिल्यांदा $100,000 प्रति टनच्या पातळीवर पोहचला आहे. ग्लोबल ऑटो इंडस्ट्रीवर कोविड १९ महामारी आणि संबंधित व्यत्ययामुळे दबाव निर्माण झाला आहे. यूक्रेन संकट अशा वेळी सुरू झाले आहे जेव्हा ऑटो उद्योग कोरोना संकटातून बाहेर पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT