Caroline Herschel
Caroline Herschel Sakal
विज्ञान-तंत्र

कॅरोलिन हर्शेल: तब्बल अडीच नक्षत्रसमुहांची यादी करणारी खगोलशास्त्रज्ञ

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आज कॅरोलिन हर्शेल या प्रेरणादायी खगोलशास्त्रज्ञेचा स्मृतीदिन..विनम्र अभिवादन !!!

महान खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्शेल (Great astronomer Caroline Herschel):

बाकी कितीही दाखले दिले तरी पुरूषप्रधान भारतातल्या स्त्रियांची अवस्था दुय्यमच होती,गोपाळनं वैयक्तिक भूमिका बदलली तेव्हा ‘आनंदी’ डॉक्टर झाली. आता जेव्हा स्त्रिया मुख्य प्रवाहात येतायेत, तेव्हा सर्वाधिक स्त्री भ्रुण हत्या होणाऱ्या हरियाणाची कल्पना चावला थेट अंतराळात जाऊन पोहोचलेल्याचं चित्र दिसतं. पुर्वी परिस्थिती अशी नव्हती. धर्मसत्तांचं प्रस्थ असल्यानं पुरूष संशोधकही सुरक्षित नव्हते तिथं स्त्रियांची काय कथा? तरीही थोडी संधी मिळाली तरी तिचं सोनं करत आपलं नाव इतिहासात कायमचं कोरणाऱ्या काही मोजक्या स्त्रिया विज्ञानविश्वात होऊन गेल्या. आज आपण त्यापैकी एकीची कहाणी जाणून घेणार आहोत. (Caroline Herschel: The Great Astronomer who lists two and a half thousand constellations)

ती जन्माला आली आणि तिला देवीचा संसर्ग झाल्यानं तिचा चेहरा कायमचा विद्रुप झाला. थोडी मोठी होते नं होते तोच तिला विषमज्वरानं गाठलं. परिणामी तिची शारिरीक वाढ अंमळ कमी राहिली. आईनं तिला घरातला केर काढणं-धुणी भांडी करणं एवढंच शिकवलं. लग्न जमणार नाही म्हणून सोबत थोडं विणकाम-भरतकामही शिकवलं. तसं वयात येतांना ती थोडंफार गाणं शिकली होती पण घरकामातून वेळच न मिळाल्यानं तिच्यातली कला फार काही बहरू शकली नाही. तिच्या आयुष्याची हौसमौज-अभ्यास करायची वेळ सगळी घरगूती कामातच गेली. मात्र विशी ओलांडली तेव्हा कुठं या जंजाळातून ती थोडीफार बाहेर पडली, जेव्हा तिला तिच्या लाडक्या भावासोबत इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.

संगीतक्षेत्रात धडपड करणारा तिचा हा थोरला भाऊ खगोलशास्त्रातला मात्र किडा होता. त्याला नवा टेलिस्कोप बनवायला मदत करणं हे तिथं तिचं मुख्य काम होऊन बसलं. दुर्बिणी बनवण्याच्या कामात भिंगं-आरसे घसाई करणं-साफसफाई हे तिचं मुख्य काम. तिनं मनोभावे भावाला मोलाची मदत तर केलीच पण बारकाईनं सगळ्या नोंदीही अभ्यासल्या. १३ मार्च १७८१ हा तो दिवस. याच दिवशी तिच्या या भावानं नवा ग्रहच शोधून काढला. तो ग्रह म्हणजे युरेनस. आणि भाऊ म्हणजे विल्यम हर्शेल. खगोलशास्त्र संघटनेनं त्याला मानाचं पद दिलं आणि त्याच्या चमूचा भाग म्हणून त्याच्या लहान बहिणीलाही स्थान दिलं. ती आयुष्यभर काम करत आली होती पण पहिल्यांदा तिला कामासाठी पगार मिळणार होता.

रक्कम ठरली वार्षिक पन्नास युरो. पगार सांकेतिक होता पण ती व्यावसायीक खगोलशास्त्रज्ञ झाली. संघटनेत काम करत असतांना तिनं स्वत:चं स्वतंत्र अवकाश निरिक्षक म्हणून वलय तयार केलं आणि १७८६ ते १८९७ या काळात एकदोन नाही तर तब्बल आठ धुमकेतू शोधून काढले. यातला एन्क नामक धुमकेतू तर या सुर्यमालेत सर्वाधिक अल्पकाळ दिसलेला धुमकेतूही तिच्या नजरेतून सुटला नाही. या सोबतच तिनं चौदा नक्षत्रसमुह फक्त शोधले असं नाही तर त्याची तारकासमूह आणि नक्षत्र अशी वर्गीकृत यादीही बनवली अर्थात ‘हे काही दिसलं आणि लिहिलं’ इतकं सोपं नव्हतं यात ५६१फक्त तारकाच होत्या.

१८२८ साली खगोलशास्त्रज्ञ संघटनेनं तिला या मौलिक कामासाठी सुवर्णपदक दिलं. असा मान मिळालेली ती पहिली स्त्री सोबतच तिला १८४६ साली प्रशियन विज्ञान अकादमीचंही सुवर्णपदक मिळालं. बालपण आजारात आणि अर्धं आयुष्य घरकामात घालवेल्या तिचं हे यश फक्त दैदिप्यमानच होतं असं नव्हे तर विशेषही होतं.

घरकाम-प्रशिक्षित गायिका-पगारी खगोलशास्त्रज्ञ या प्रवासात सोबतीला तथाकथित रंगरूप नसतांना नव्या भाषा शिकणं-लोकांना सामोरं जाणं आता वाटतं तितकं सोपं खचितच नव्हतं. ती कुठं पोहोचली फक्त हे महत्वाचं नव्हतं ती इथंपर्यंत कुठून आणि कशी आली हे ही तितकंच महत्वाचं होतं. १८२२ साली तिचा भाऊ आणि गुरू विल्यम इहलोकी गेल्यानंतरही तिनं आपलं काम सुरू ठेवलं आणि तब्बल अडिच हजार नक्षत्रसमुहांची आणि कित्येक तारकासमूहांची यादी केली आणि आपल्या कामानं खगोलशास्त्रज्ञ संघटनेत ‘ध्रुवपद’ मिळवलं..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT