CNG Car Mileage
CNG Car Mileage esakal
विज्ञान-तंत्र

CNG Car Mileage: CNG कारमध्ये बेस्ट Mileage कसं मिळवाल? सोप्पी ट्रिक कामी येईल!

Pooja Karande-Kadam

CNG Car Mileage: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १०० रुपयांच्या पुढे आहेत. यामुळे ग्राहक आता नवीन कार खरेदी करताना CNG कारचा विचार करतात. त्यातही चांगले मायलेज कसे मिळेल याकडे लोकांचा कल असतो.

लोक Mileage चा खूप विचार करू लागले आहेत. प्रामुख्याने मध्यमवर्गीय वाहनधारक कारच्या मायलेजचा खूप विचार करतात. तुम्ही देखील कारच्या Mileage ने किंवा इंधनाच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्रस्त असाल तर या बातमीत दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करून तुमच्या कारचं मायलेज वाढवू शकता.

पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी तुलनेने स्वस्त आहे. वाहनधारकांसाठी तो एक कमी खर्चीक पर्याय आहे. याव्यतिरिक्त पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत सरकार CNG वाहनांना प्रोत्साहन देत आहे.

टायरमधील हवा पहा

तुमच्या कारमध्ये वेळोवेळी हवा चेक करत असाल. हवा कमी असलेले टायर रोलिंग प्रतिरोध वाढवू शकतात, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेलं मायलेज कार देत नाही.

सीएनजी इंजीनकडे लक्ष ठेवा

तुमच्या सीएनजी इंजीनावर लक्ष ठेवा, बारीक सारीक बिघाड असेल तर वेळीच त्याचे सर्व्हिंसिंग करून घ्या. सर्व्हिंसिंग करून घेताना चांगल्या मेकॅनिकल कडूनच गाडी चेक करा.

वेळोवेळी गाडी बंद करा

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असाल. आणि तेव्हा तुमची गाडी सुरूच असेल तर ते योग्य नाहीय. चांगलं मायलेज हवं असेल तर वेटींगला गाडी बंद करणं कधीही चांगलं. कारण, तुमची ही सवय तुम्हाला चांगले मायलेज मिळते. (Car )

गाडीतील वजन कमी करा

कारचे वजन कमी करण्यासाठी अनावश्यक वस्तू काढून टाका. अतिरिक्त वजनामुळे इंजिनवर ताण येतो आणि इंधन कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे CNG कार सुस्साट पळवायची असेल तर कमी सामानात तुम्हाला अधिक मायलेज मिळेल.

एअर फिल्टर, क्लचची काळजी घ्या

कारचे पार्ट सुस्थितीत असतील तरच कार चांगले मायलेज देऊन सुस्साट पळेल. त्यामुळे कारच्या पार्टची काळजी घ्या. एअर फिल्टर, क्लच यांची वेळोवेळी तपासणी करून घ्या. एअर फिल्टर नियमितपणे साफ केला जातो किंवा आवश्यकतेनुसार बदलला जातो याची खात्री करा. क्लच योग्यरित्या काम करत असल्याची खात्री करा कारण जीर्ण झालेला क्लच वाहनाच्या मायलेजवर नकारात्मक परिणाम करतो. (Driving Tips)

योग्य स्पार्क प्लग वापरा

तुमच्या सीएनजी वाहनात योग्य स्पार्क प्लग वापरले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. CNG स्पार्क प्लगमध्ये स्पार्क आणि प्लगच्या टोकामध्ये कमी अंतर असते. विशेषत: सीएनजी ऍप्लिकेशन्ससाठी डिझाइन केलेले स्पार्क प्लग निवडण्याचा सल्ला दिला जातो.

अधिकृत ठिकाणीच CNG बसवा

बऱ्याचदा लोक अधिकृत ठिकाणाऐवजी कुठूनही सीएनजी किट बसवतात, यामुळे तुमचे पैसे वाचत नाहीत पण जास्त खर्च होतात. कारण प्रमाणित स्टेशनशिवाय सीएनजी किट न लावल्यामुळे, मेकॅनिक्स लोकल पार्ट्स त्यात टाकतात आणि ते लवकर खराब होतात. यामुळे तुमचा खर्च कमी होण्याऐवजी वाढतो. तसेच, त्याचा मायलेजवरही परिणाम होतो. त्यामुळे नेहमी अधिकृत ठिकाणाहून सीएनजी किट बसवा. (Car Care Tips)

एक्सलरेट आणि ब्रेक

वारंवार ब्रेक लावल्याने तसेच वेगाने एक्सलरेट घेतल्यास जास्त इंधन लागते. त्यामुळे मायलेज कमी होते. मेट्रो शहरात राहणाऱ्या लोकांना नेहमी ट्रॅफिक जाम किंवा रेड लाइट वर लवकर पोहोचण्याच्या नादात वेगाने एक्सलरेटरचा वापर केला जातो. त्यामुळे वारंवार ब्रेक लावला जातो. त्यामुळे मायलेज कमी होते.

कारचा वेग कमी ठेवा 

जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर आपली कार ४५ ते ६० या किलोमीटर प्रति वेगाने गाडी चालवा. या स्पीडमध्ये सर्वात जास्त रेंज देते. कारला जास्त वेगाने आणि कमी हळून चालवल्याने मायलेज कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT