Cyber Security news esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Security : सावधान! तुम्ही हे ॲप वापरत असाल तर बँक अकाऊंटमधून पैसे होतील गायब

मोबाईलवर कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करताना सायबर सिक्युरिटी महत्वाची

सकाळ डिजिटल टीम

Cyber Security : जे ॲप्स परवानगीशिवाय यूजर्सचा डेटा संग्रहित करत होते त्यांना गुगलने यापूर्वीही प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते.स्मार्टफोन आल्याने आपली अनेक काम खूप सोईची झाली आहेत पण तितकच स्मार्टफोनमुळे जोखीमही वाढली आहे. आपले महत्वाचे डॉक्युमेंट्स बँकेचे डिटेल्स सगळंच असतं. मोबाईलवर कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करतांना सायबर सिक्युरिटी महत्वाची असते.

अनेकदा काही ॲप डाऊनलोड करून अचानक आपल्या बँकमधले पैसे कट होता आहेत; किंवा आर्थिक व्यवहार आपोआप होतात, पण अशा वेळेस काय करावे हे कळत नाही. याचसाठी या काही टिप्स ज्या केवळ तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवणार नाही, तर तुमची गोपनीयता देखील राखेल.

Google ने Play Story मधून याआधीही असे काही ॲप्स काढून टाकले होते. वास्तविक या सर्व ॲप्सना परवानगीशिवाय यूजर्सचा डेटा मिळत होता. मेटा (फेसबुक) ने दावा केला आहे की 1 दशलक्ष वापरकर्त्यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर असे ॲप डाउनलोड केले आहेत जे त्यांचा वैयक्तिक डेटा चोरत आहेत. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये असे ॲप्स असतील तर ते तुमचा वैयक्तिक डेटा तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवू शकतात.

Android वापरकर्त्यांसाठी अशा ॲप्सपासून दूर राहणे खूप सोपे आहे. कारण असे अनेक सॉफ्टवेअर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत जे असे मालवेअर काढून टाकू शकतात. Joker Malware चे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक टेक कंपन्यांची चिंताही वाढली आहे. याबाबतचा नवा अहवालही काही काळापूर्वी समोर आला होता.

मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी, 'ऑप्टिमायझिंग' आणि 'क्लीनिंग' समाविष्ट केले आहे, जसे की सुपर क्लीन, रॉकेट क्लीनर हे फंक्शन आहेत. मात्र, त्यानंतरही गुगलची टीम काम करत असते.जेव्हाही तुम्ही एखादे ॲप डाउनलोड करता तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. जसे की तुम्ही प्रथम ॲपबद्दल माहिती मिळवावी. अनेक वेळा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे नंतर खूप नुकसान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Troohy: अजिंक्य रहाणेवर चांगल्या कामगिरीचे दडपण वाढले, मुंबईचा आजपासून छत्तीसगढविरुद्ध सामन्याला सुरुवात

Brahmin Farmers : ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांच्या कूळ कायद्यातील जमीनी परत मिळाव्यात, ब्राम्हण महासंघाची मागणी

BMCसाठी भाजपचा दीडशे पारचा नारा अन् शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; कारण काय?

Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; प्रशांत बनकरला घेतलं ताब्यात, आरोपींना फाशीची मागणी

Mumbai Crime : दहा वर्षे प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT