Dance of the Hillary malware social media cyber attack esakal
विज्ञान-तंत्र

पाकिस्तानकडून नवा सायबर हल्ला! "Dance of the Hillary" मालवेअरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, कसं राहाल सुरक्षित? लगेच पाहा

“Dance of the Hillary” नावाचे मालवेअर सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून भारतीय युजर्सवर हल्ला करत आहे. याच्यापासून कसे सुरक्षित राहायचे, जाणून घ्या

Saisimran Ghashi

Dance of the Hillary Malware Risk : सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच आता एक नवा धोका डिजिटल पातळीवर उभा राहिला आहे. पाकिस्तानकडून “Dance of the Hillary” नावाचे घातक मालवेअर सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून भारतीय नागरिकांवर पाठवले जात असल्याचा गंभीर इशारा देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. हे सायबर हल्ले वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरीसाठी केले जात असून, यामुळे कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानकडून सायबर हल्ल्यांची सुरुवात

पाकिस्तानने पारंपरिक हल्ल्यांपासून पुढे जात आता सायबर युद्ध सुरू केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की Facebook, WhatsApp, Instagram तसेच ईमेलच्या माध्यमातून “Dance of the Hillary” हा मालवेअर भारतात पसरवला जात आहे. या हल्ल्यामुळे अनेकांचे मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक काही क्षणांत संक्रमित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

“Dance of the Hillary” मालवेअर काय आहे?

हा एक अत्यंत घातक आणि प्रगत प्रकारचा मालवेअर आहे जो ऑडिओ फाईल्स आणि डॉक्युमेंट फाईल्सच्या स्वरूपात पाठवला जातो. एकदा डिव्हाइसमध्ये इंस्टॉल झाला की, तो सिक्युरिटी फायरवॉल्सना चुकवून थेट तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, पासवर्ड्स आणि इतर संवेदनशील माहिती चोरतो. त्यानंतर युजर्सला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता प्रचंड वाढते.

डेटा सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना करा

  1. अँटीव्हायरस वापरा: मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये विश्वासार्ह अँटीव्हायरस इन्स्टॉल करा.

  2. सिस्टम अपडेट ठेवा: तुमचे मोबाईल आणि संगणक कायम अपडेटेड ठेवा.

  3. जोडलेले पासवर्ड वापरा: बँकिंग आणि सोशल मीडिया खात्यांसाठी क्लिष्ट व वेगवेगळे पासवर्ड ठेवा.

  4. 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन: Gmail आणि महत्त्वाच्या अ‍ॅप्समध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवा.

  5. अ‍ॅप्स डाउनलोड करताना सतर्कता: कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्याआधी त्याचा सोर्स आणि परवानग्या तपासा.

  6. अनोळखी लिंक्स टाळा: कोणताही संशयास्पद लिंक किंवा ईमेल उघडू नका.

  7. सायबर गुन्हा रिपोर्ट करा: जर चुका करून एखादा फाईल ओपन झाला आणि आर्थिक नुकसान झाले, तर 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर तात्काळ संपर्क साधा.

"tasksche.exe" या फाईलपासून सावध राहा

गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट सूचना दिली आहे की, "tasksche.exe" नावाची कोणतीही फाईल मिळाल्यास ती ताबडतोब डिलीट करा. ही फाईल हा मालवेअर पसरवण्याचा मुख्य मार्ग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही सायबर मोहिम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जात असून सर्व भारतीय युजर्सना सोशल मीडियावर, ईमेलवर आणि इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT