A Decade of Digital India" Reel Contest esakal
विज्ञान-तंत्र

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Celebrate A Decade of Digital India with creative reels : १ ऑगस्टपर्यंत पर्यंत असाणार आहे संधी ; जाणून घ्या, सर्व तपशील

Mayur Ratnaparkhe

What Is the "A Decade of Digital India" Reel Contest?: देशातील रील स्टार्ससाठी किंवा रील बनवण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. केंद्र सरकारद्वारे लाँच केले गेलेल्या डिजिटल इंडिया प्रोग्रामला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. केंद्रात सरकार बनवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने १ जुलै २०१५ रोजी डिजिटल इंडियाची प्रोग्रामची सुरुवात केली होती.

आता याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने देशवासासियांसाठी एक स्पेशल कॉन्टेस्ट सुरू केला आहे. जाय कॉन्टेस्टचं नाव 'A Decade of Digital India - Reel Contest' आहे. या स्पर्धेची सुरुवात १ जुलैपासून झाली असून १ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेअंतर्गत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजेत्यांना मिळणार १५-१५ हजार रुपये -

या स्पर्धेअंतर्गत तुम्हाला तुमची पर्सनल स्टोरी आणि क्रिएटिव्हि रिल्स शेअर करायची आहे, जी डिजिटल इंडिया मोहीमेशी जुडलेली असावी. तुम्हाला अशी रील बनवायची आहे, ज्यामध्ये हे दाखवावां लागेल की, डिजिटल इंडियाने तुमच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम केला आहे.

सरकारी सेवांपर्यंत ऑनलाइन प्रवेशापासून ते डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा किंवा आर्थिक साधनांच्या फायद्यांपर्यंत - प्रत्येक रील तंत्रज्ञानाने देशभरातील नागरिकांना कसे सक्षम केले आहे हे अधोरेखित करेल. या स्पर्धेअंतर्गत केंद्र सरकार बक्षिसे देखील देईल. पहिल्या १० विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपये, पुढील २५ विजेत्यांना प्रत्येकी १०,००० रुपये आणि पुढील ५० विजेत्यांना प्रत्येकी ५,००० रुपये बक्षीस दिले जाईल.

रील्स बनवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील -

A Decade of Digital India - Reel स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल. तुमची रील किमान १ मिनिटाची असावी. तुमची रील पूर्णपणे ओरिजनल असावी आणि त्यापूर्वी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसावी. तुम्ही तुमची रील हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्थानिक भाषेत बनवू शकता. रील पोर्ट्रेट मोडमध्ये बनवावी आणि MP4 फाइलमध्ये असावी. या स्पर्धेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही माझे सरकार वेबसाइट https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest/ ला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT