Doogee V Max
Doogee V Max Sakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Phone: भन्नाट! 22000mAh बॅटरी अन् 19GB रॅमसह येतोय 'हा' स्मार्टफोन, फीचर्स पाहून मन खुश होईल

सकाळ डिजिटल टीम

Doogee V Max Phone Launch Soon: कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही त्याची बॅटरी असते. बाजारात ५००० एमएएच, ६००० एमएएच बॅटरीसह येणारे अनेक शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. मात्र, तरीही दिवसभर फोनचा वापर करत असल्याने ही बॅटरी देखील कमी पडते. यावर उपाय म्हणून आता बाजारात चक्क २२००० एमएएच बॅटरीचा फोन येणार आहे.

या हँडसेटचे नाव Doogee V Max असून, हा एक रग्ड स्मार्टफोन आहे. पुढील महिन्यात या फोनची बाजारात एंट्री होणार आहे. एकदा चार्ज केल्यावर फोनला १० दिवस सहज वापरू शकता. तर ६४ दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळेल. बॅटरी व्यतिरिक्त या फोनमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. यात १९ जीबीपर्यंत रॅम सपोर्ट देखील मिळेल.

३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो फोन

Doogee V Max स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह २२००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. बॅटरी चार्जिंगसाठी यूएसपी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये फोनची बॅटरी १० दिवस टिकते.

मिळेल १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा

या रग्ड स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी IPS डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आला आहे. तर फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट मिळेल. यात १०८ मेगापिक्सल प्रायमरी लेंस, २० मेगापिक्सल नाइट व्हिजन कॅमेरा आणि १६ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देखील मिळेल.

हेही वाचा: Smart TV Offer: आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटांचा आनंद, ५५ इंच Smart TV वर ८५ हजारांचा डिस्काउंट

१९ जीबीपर्यंत मिळेल रॅम

फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, इन्फ्रारेड नाइट व्हिजन लाइट्स देखील दिली आहे. फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. रॅमला १९ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोन मीडियाटेक डायमेंसिटी १०८० चिपसेटसह येईल.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT