Tech Tips
Tech Tips esakal
विज्ञान-तंत्र

Tech Tips : Google Chrome वापरणाऱ्यांनो सरकारने सांगितलेलं ऐका, नाहीतर Laptop, PC भंगारातच द्यावा लागेल!

Pooja Karande-Kadam

Tech Tips : काहीही शंका असेल, काही सापडत नसेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तर आपण सगळेच गुगलवर सर्च करतो. लहान मुलांचा अभ्यास असो वा मोठ्या  मुलांचे सबमिशन्स गुगल क्रोम सगळ्यांच्याच सवयीचा झालाय.

असा हा Google Chrome  वापरणाऱ्या युजर्सना सरकारने एक इशारा दिला आहे. गुगल क्रोम वापरताना सरकारी डिपार्टमेंटकडून काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगण्यात आली आहे. त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या नाहीत तर तुमचा लॅपटॉप, पीसी भंगारात घालावा लागू शकतो. त्या काय गोष्टी आहेत या आपण पाहुयात.

सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) Google Chrome वापरकर्त्यांसाठी धोकादायक इशारा दिला आहे. गुगलच्या या लोकप्रिय ब्राउझरमध्ये अनेक बग समोर आल्या आहेत. या बगचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या लॅपटॉपला टार्गेट करू शकतात. तुमचे डिव्हाइस हॅक करून तुमचा संपूर्ण डेटा ते टोरू शकतात.

हॅकर्सनी तुमच्या लॅपटॉपवर हल्ला केल्यानंतर तुमचा डेटा गायब होऊ शकतो. तसेच, ते तुमच्या लॅपटॉपमधील माहितीचा गैरवापरही करू शकतात. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नोटमध्ये असे म्हटले आहे की, Google Chrome मध्ये अनेक Bugs आहेत. ज्याचा वापर करून तुमचा कंप्युटर हॅक केला जाऊ शकतो.

यापासून काय धोका आहे?

Google Chrome एक लोकप्रिय ब्राउझर आहे. लाखो लोक दररोज त्याचा वापर करतात. इतर सॉफ्टवेअरप्रमाणे त्यातही अनेकदा बग असतात, ज्याचा सायबर गुन्हेगार फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.

रिमोट हॅकर्स या बग्सचा फायदा घेण्यात यशस्वी ठरल्यास, ते तुमच्या लॅपटॉपवर कंट्रोल मिळवतात. डेटा चोरू शकतात किंवा सिस्टममध्ये मालवेअर देखील स्थापित करू शकतात.

यापासून कसा कराल बचाव 

  1. धोका कमी करण्यासाठी, CERT-In ने Google Chrome वापरकर्त्यांना त्यांचे वेब ब्राउझर सेफ्टी फिचर्सवापरून अपडेट रहायला सांगतात.

  2. बग्ज असतील तर Google ने आधीच अद्यतने जारी केली आहेत.

  3. सॉफ्टवेअर अपडेट करण्याव्यतिरिक्त, कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट देणे टाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT