Electric Car Sakal
विज्ञान-तंत्र

Electric Car: दिव्यांगांसाठी लाँच झाली हटके इलेक्ट्रिक कार, फीचर्स जबरदस्त; पाहा किंमत

एका स्टार्टअपने दिव्यांगांसाठी खास इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या कारमध्ये स्टेअरिंगऐवजी हँडलबार दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Electric Car for Disabled Person: भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अनेक स्टार्टअप्स आता या सेगमेंटमध्ये उतरत आहेत. लोकांची मागणी पाहता कंपन्या देखील वेगवेगळ्या फीचर्ससह येणाऱ्या कार लाँच करत आहेत. आता एका स्टार्टअप कंपनीने दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन इलेक्ट्रिक कार बनवली आहे. या कंपनीचे नाव केंगुरू आहे.

या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे दिव्यांग व्हीलचेअरसह यात बसू शकतात. विशेष म्हणजे आत बसताना कोणतीही समस्या येणार नाही, हे लक्षात घेऊन कारला डिझाईन करण्यात आले आहे.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

कार चालवणे देखील खूपच सोपे

या कारमध्ये दिव्यांगांना बसणे सोपे तर आहेच, सोबतच कार चालवतानाही कोणतीही समस्या येणार नाही. पाहताना ही गाडी नियमित कारप्रमाणेच वाटते, परंतु यात स्टेअरिंगऐवजी हँडलबार दिला आहे. यामुळे व्हीलचेअरवर बसून दोन्ही हातांनी कार ड्राइव्हिंग करणे सोपे जाते. एवढेच नाही तर हँडलबारमध्येच ब्रेक आणि हॉर्नसह अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे कोणीही सहज या इलेक्ट्रिक कारला चालवू शकते.

रिमोटने कंट्रोल करणे शक्य

कारच्या आत बसल्यानंतर रिमोटने दरवाजा कंट्रोल करणे शक्य आहे. दरवाजा उघडण्यासाठी ताकद लावण्याची गरज पडत नाही. कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे याच्या मागील बाजूला एक दरवाजा दिला असून, जो वरील बाजूला उघडतो. अशाप्रकारचे दरवाजे प्रामुख्याने हॅचबॅक कारमध्ये पाहायला मिळतात. या दरवाजाच्या माध्यमातून व्हीलचेअर ठेवण्यासोबतच अन्य वस्तू देखील सहज ठेवू शकता.

किंमत आणि रेंज

या इलेक्ट्रिक कारमध्ये २ किलोवॉटची दमदार मोटर दिली आहे. कारचा टॉप स्पीड ताशी ४५ किमी आहे. तसेच, एकदा चार्ज केल्यावर कार ७० ते ११० किमी अंतर सहज पार करते. या कारची अमेरिकन बाजारातील किंमत २५ हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे. दरम्यान, ही कार भारतासह इतर बाजारात कधी लाँच होणार याबाबतची अधिकृत माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT