Electricity Bill eSakal
विज्ञान-तंत्र

Electricity Bill : घरमालक जास्त लाईट बिल घेतोय? सब-मीटरमध्ये असू शकतो झोल; लगेच करा चेक!

तुमचा घरमालक देखील असं करत असल्याचा संशय तुम्हाला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Sudesh

आजकाल सर्वच गोष्टी महाग होत आहेत. सिलेंडरपासून ते वीजेच्या दरापर्यंत सर्वच गोष्टी आवाक्याबाहेर चालल्या आहेत. मात्र, तुम्हाला जर असं वाटत असेल, की थोड्याशा वापरासाठी तुम्ही जरा जास्तच लाईट बिल भरत आहात; तर याला कदाचित तुमचा घरमालकही कारणीभूत असू शकतो.

अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये घरमालक सब-मीटरमध्ये छेडछाड करून भाडेकरूंना भरमसाठ बिल भरायला लावतो आहे. सब-मीटर हे मुख्य मीटरला जोडलेले असल्यामुळे मालकाला कमी आणि भाडेकरूला जास्त बिल येतं. तुमचा घरमालक देखील असं करत असल्याचा संशय तुम्हाला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

असा तपासा झोल

तुमच्या घरमालकाने सब-मीटरमध्ये काही गडबड केली आहे का हे तपासणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला गेल्या काही महिन्यांचं बिल पहावं लागेल. एखाद्या महिन्यात तुमचा वापर सारखाच आहे, आणि बिल अचानक वाढलेलं दिसलं, तर तिथे शंकेला वाव निर्माण होतो.

उन्हाळ्यात बिल येतं जास्त

हे लक्षात घ्या की उन्हाळ्यात आपल्याकडे फॅन, एसी अशा गोष्टी भरपूर प्रमाणात वापरल्या जातात. त्यामुळे उन्हाळ्यात स्वाभाविकपणे लाईट बिल जास्तच येतं. त्यामुळे आधीच्या लाईट बिलसोबत तुलना करताना तुम्ही या उन्हाळ्यातील बिल मागच्या उन्हाळ्यातील बिलाशीच कम्पेअर करताय, याची खात्री करा.

दुसरं मीटर लाऊन पाहा

जर तुम्हाला वीज बिलामध्ये काही गफलत असल्याचं दिसून आलं, तर तुमच्या सब-मीटरजवळ तुम्ही दुसरं मीटर लावून पाहू शकता. या दोन्ही मीटरवर जर वेगवेगळं रीडिंग आलं, तर जुन्या मीटरमध्ये काहीतरी घोटाळा असल्याचं स्पष्ट होईल. मात्र जर हे दोन्ही रीडिंग समान आले, तर तुम्हालाच वीजेचा वापर प्रमाणात करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT