Elon Musk Gaza Stripe eSakal
विज्ञान-तंत्र

Israel War : इस्राइल-हमास युद्धात आता इलॉन मस्कची उडी! गाझा पट्ट्यात पुरवणार मोठी मदत

Elon Musk Starlink : इस्राइलने गाझा पट्ट्यात जाणारी सर्व मदत रोखली आहे.

Sudesh

इस्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्राइलने गाझा पट्ट्यात सर्व बाजूंनी हल्ले सुरू केले आहेत. तसंच, या ठिकाणी जाणारी सर्व मदत रोखली आहे. या युद्धामध्ये आता टेक जायंट इलॉन मस्कने देखील उडी घेतली आहे. याठिकाणी आता मस्कची स्टारलिंक कंपनी इंटरनेट पुरवणार आहे.

इस्राइलने गाझा पट्ट्यात जाणारी सर्व मदत रोखली आहे. याठिकाणी वीज, इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. यामुळे नागरिकांना तर त्रास होतोच आहे, मात्र बचावकार्यात देखील अडथळा येत आहे. यामुळेच इलॉन मस्कने आता याठिकाणी सॅटेलाईट इंटरनेट पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

अ‍ॅलेक्झँड्रिया ओकासियो-कॉर्टेज यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या म्हणतात, की "2.2 मिलियन लोकसंख्येचा संपूर्ण संपर्क तोडणे हे बरोबर नाही. पत्रकार, वैद्यकीय कर्मचारी, बचाव कर्मचारी आणि निष्पाप हे सगळेच धोक्यात आहेत." (Global News)

यावर रिप्लाय देत इलॉन मस्कने सांगितलं, की स्टारलिंक ही कंपनी गाझामध्ये मदत पुरवत असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांना इंटरनेट सेवा पुरवणार आहे. सामान्य नागरिक आणि पत्रकारांना या इंटरनेटचा अ‍ॅक्सेस मिळणार का याबाबत मात्र कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT