EPFO esakal
विज्ञान-तंत्र

पगारातून PF कट होतोय? केंद्र सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

नोकरदारांना केंद्र सरकार पुन्हा एकदा आनंदाची बातमी देणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नोकरदारांना केंद्र सरकार पुन्हा एकदा आनंदाची बातमी देणार आहे.

नोकरदारांना केंद्र सरकार (Central Government) पुन्हा एकदा आनंदाची बातमी देणार आहे. काम करत असताना तुम्हाला जो पगार मिळतो त्यातून जर तुमचा पीएफ (PF) कापला जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. पीएफ कपात करणारी कंपनी ईपीएफओ लवकरच आर्थिक वर्ष 2021-22 च्या व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे.

'ईपीएफओ'शी (EPFO) संबंधित निर्णय घेणारी संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची येत्या मार्चमध्ये गुवाहाटी (Guwahati) येथे बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारमधील कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav)यांनीही याबाबत माहिती दिली आहे. नुकत्याच दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी केलेल्या जमा पीएफ शिल्लक रकमेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय पुढील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे घेतला जाईल. उल्लेखनीय म्हणजे भूपेंद्र यादव हे सध्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे प्रमुखही आहेत.

त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पीएफ खात्यातील जमा रकमेवरील व्याजाचा दर 8.5 टक्के करण्यात आला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये या निर्णयाला मंजुरी दिली होती. या निर्णयानंतर पीएफवरील व्याजदर सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला होता. याआधी 2018-19 या आर्थिक वर्षात ईपीएफओने 8.65 टक्के व्याज दिले होते. यापूर्वी 2013-14 या आर्थिक वर्षात हा व्याजदर 8.75 टक्के करण्यात आला होता.

ईपीएफओने नुकतीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की, नोव्हेंबर 2021 मध्ये सुमारे 14 लाख कर्मचारी जोडले गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 38 टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये जोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत यात 3.84 लाख कर्मचाऱ्यांची वाढ झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये ईपीएफओने 10 लाखांहून अधिक कर्मचारी जोडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT