Facebook Message Leak eSakal
विज्ञान-तंत्र

Facebook Message Leak : फेसबुकने पैशांसाठी लीक केले तुमचे पर्सनल मेसेज, नेटफ्लिक्सला दिला अ‍ॅक्सेस; रिपोर्टमध्ये मोठा दावा

Netflix : मेटाविरोधात दाखल केलेल्या एका खटल्यामध्ये असं म्हटलं होतं, की त्यांनी नेटफ्लिक्सच्या प्रभावाखाली येत आपला स्ट्रीमिंग बिझनेस बंद केला आहे.

Sudesh

Facebook sold Private Messages to Netflix : सोशल मीडिया म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर फेसबुक हे नाव पहिल्यांदा येतं. याच फेसबुकवर आतापर्यंत कित्येक वेळा डेटा लीक केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र आता एका रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मेटाने फेसबुकच्या मेसेजचा अ‍ॅक्सेस चक्क नेटफ्लिक्सला दिला असल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

बार्टर डेटा एक्सचेंज (Barter Data Exchange) प्रकरणात सुरू असलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. फेसबुकने यूजर्सचे प्रायव्हेट मेसेज एका थर्ड-पार्टी अ‍ॅपला शेअर केल्याचं कोर्टात सांगण्यात आलं आहे. गिझमोडोने (Gizmodo) दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकने हा अ‍ॅक्सेस लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला दिला आहे.

कसं झालं उघड?

मेटाविरोधात दाखल केलेल्या एका खटल्यामध्ये असं म्हटलं होतं, की त्यांनी नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रभावाखाली येत आपला स्ट्रीमिंग बिझनेस बंद केला आहे. फेसबुक यापूर्वी Facebook Watch याठिकाणी कित्येक ओरिजिनल शो ऑफर करत होतं. मात्र, फेसबुकने ही सेवा बंद करत, स्पर्धा रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे.

कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, नेटफ्लिक्स आणि फेसबुकचे चांगले व्यावसायिक संबंध होते. नेटफ्लिक्स फेसबुकवर जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत होतं. त्यामुळेच नेटफ्लिक्सने फेसबुकला ओटीटी मार्केटमध्ये स्पर्धा करण्यापासून थांबवलं.

प्रायव्हेट मेसेजचा अ‍ॅक्सेस

2013 नंतर झालेल्या अग्रीमेंटनुसार फेसबुकने नेटफ्लिक्सला यूजर्सच्या प्रायव्हेट मेसेजेचा अ‍ॅक्सेसही दिला. या बदल्यात नेटफ्लिक्स फेसबुकला दर दोन आठवड्याला एक लेखी अहवाल सादर करत होता. यामध्ये यूजर्सचे रिसिपेंट क्लिक्स, दररोजचे रेकमेंडेशन काउंट्स आणि इतर माहिती दिलेली होती. यासाठी नेटफ्लिक्सने थेट पैसे दिले नव्हते. मात्र, फेसबुकवर अब्जावधी डॉलर्सच्या जाहिराती खरेदी केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT