face app. 
विज्ञान-तंत्र

Appleचं ब्लू टिक फेसबुकनं हटवलं; एका फीचरमुळे झाला वाद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - Apple आणि Facebook यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. फेसबुक अ‍ॅपलकडून दिल्या जाणाऱ्या iOS 14 मधील एका प्रायव्हसी फीचरमुळे नाराज आहे. आता यात फेसबुकने अ‍ॅपलच्या फेसबुक पेजचं व्हेरिफिकेशन काढून घेतलं आहे. यामुळे फेसबकुवर अ‍ॅपलच्या ऑफिशिअल पेजवर आता ब्लू टिक दिसत नाही. 

फेसबुक अ‍ॅपलच्या जितक्या स्पर्धक कंपन्या आहेत त्यांचे फेसबुक पेज व्हेरिफाइड आहे. तिथं ब्लू टिकसुद्धा आहे. मात्र आता अ‍ॅपलच्या पेजवरून व्हेरिफिकेशन हटवण्यात आलं आहे. नुकतंच अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी फेसबुकच्या या नाराजीवर म्हटलं होतं की, अ‍ॅपल फेसबुकला त्यांच्या युजर्सचा डेटा ट्रॅक करण्यापासून रोखत नाही. तर अ‍ॅपल त्यांच्या युजर्सना पर्याय देऊ इच्छिते की त्यांचा डेटा ट्रॅक व्हावा की नाही हे ठरवता यावं. 

अ‍ॅपलच्या ज्या फीचरमुळे फेसबुक नाराज आहे ते आता भारतातही आलं आहे. काही युजर्सना हे फीचर देण्यात आलं आहे. मात्र सध्या काही अ‍ॅपमध्येच ते फीचर काम करतं. मात्र येत्या काळात iOS 14.4 च्या अपडेटसोबत अ‍ॅपलचं हे फीचर सर्व युजर्सना मिळणं सुरू होईल. 

पेजवरून व्हेरिफिकेशन हटवल्यानंतर फेसबुक किंवा अ‍ॅपलकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीने दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरु आहे त्यावरून येत्या काही काळात मोठा बदल बघायला मिळू शकतो. 

काय आहे प्रकरण - 
फेसबुक त्यांचे अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सना टार्गेटेड अ‍ॅड किंवा पर्सनलाइज्ड अ‍ॅड्ससाठी ट्रॅक करते. म्हणजेच युजर्सचे डिटेल्स गोळा करते. हा डेटा इतर बिझनेसला विकला जातो. अ‍ॅपलच्या नव्या प्रायव्हसी फीचरमुळे युजर्सना फेसबुकच्या या फीचरला डिसेबल करण्याची सुविधा मिळते. 

नव्या आयओएस अपडेटमध्ये हे फीचर मिळणार आहे. जेव्हा तुम्ही फेसबुक किंवा कोणतंही अ‍ॅप पहिल्यांदा ओपन कराल तेव्हा प्रायव्हसी प्रॉम्प्ट मिळेल. याठिकाणी लिहिलं असेल की तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वत:ला ट्रॅक करण्यापासून मनाई करू शकता. त्यामुळे लोक टार्गेटेड अ‍ॅड्ससाठी स्वत:ला ट्रॅक न होऊ देण्याचा पर्याय निवडतील अशी भीती फेसबुकला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT