Facebook sakal
विज्ञान-तंत्र

फेसबुकची मोठी कारवाई, द्वेष पसरवणाऱ्या 3 कोटी पोस्ट हटवल्या

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) द्वेष आणि तिरस्कार वाढवणाऱ्या कंटेटवर मोठी कारवाई केली आहे. जून 2021 च्या तिमाहीत फेसबुकने कारवाई करत या प्लॅटफॉर्मवरून असा तब्बल 3.15 कोटी पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. मार्च 2021च्या तिमाहीत 2.52 कोटी अशा प्रकारचा कंटेन्ट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे. जागतिक स्तरावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा कंटेटमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, आता प्लॅटफॉर्मवर द्वेष पसरवणाऱ्या कंटेंटची संख्या प्रत्येक 10,000 कंटेंटमध्ये 5 पर्यंत खाली आली आहे.

आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यात 15 पट वाढ

फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट (इंटेग्रेटी) गाय रोज़ेन यांनी सांगीतले की, त्यांनी 3.15 कोटी कंटेंटवर जून 2021 तिमाहीत कारवाई केली आहे. या व्यतिरिक्त, इंस्टाग्राम वरून 98 लाख अशा प्रकारचा कंटेंट काढून टाकण्यात आला आहे, तर मार्च 2021 च्या तिमाहीत ही संख्या 63 लाख होती. सलग तिसऱ्या तिमाहीत फेसबुकवर द्वेष पसरवणारा कंटेंट कमी झाला आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI)चा वापर

रोसेन यांनी सांगितले की, हे सर्व आकडे 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत फेसबुकच्या कम्युनिटी स्टँडर्ड्स एनफोर्समेंट रिपोर्टचा भाग आहेत.आक्षेपार्ह कंटेंटमधील घट ही कंपनीच्या सक्रिय कामामुळे आणि असा कंटेंट ओळखण्यात करण्यात आलेल्या सुधारणामुळे नोंदविण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील कंपनीने केलेल्या गुंतवणुकीमुळेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) द्वेषयुक्त कंटेंट शोधणे शक्य होत आहे. हे तंत्रज्ञान आम्हाला कोट्यवधी वापरकर्ते आणि अनेक भाषांमध्ये कंपनीची धोरणे राबवण्यात मदत करत असल्याचे त्यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT